bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Kings 3
2 Kings 3
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 4 →
1
यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम शोमरोनात राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले.
2
परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापाइतके केले नाही; कारण त्याच्या बापाने केलेला बआलमूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकला.
3
तरी जी पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून करवली त्यांचे त्याने अवलंबन केले; ती त्याने सोडली नाहीत.
4
मवाबाच्या राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता; तो इस्राएलाच्या राजाला एक लाख कोकरांची व एक लाख एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे.
5
अहाब मेल्यावर मवाबाचा राजा इस्राएलाच्या राजावर उलटला.
6
त्या वेळी यहोराम राजाने शोमरोनातून बाहेर निघून सर्व इस्राएलाची जमवाजमव केली.
7
त्याने जाऊन यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला असा निरोप पाठवला की, “मवाबाचा राजा माझ्यावर उलटला आहे, तर त्याच्याशी लढायला आपण माझ्याबरोबर येता काय?” तो म्हणाला, “हो, मी येतो; आपण आणि मी एकच; माझे लोक ते आपले लोक; माझे घोडे ते आपले घोडे.”
8
त्याने विचारले, “कोणत्या मार्गाने आपण जावे?” त्याने म्हटले, “अदोमी रानाच्या वाटेने.”
9
त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदाचा राजा आणि अदोमाचा राजा ह्यांनी कूच केले; त्यांनी वळसा घेऊन सात मजला केल्यानंतर सर्व सेना व त्यांच्याबरोबर असलेली जनावरे ह्यांना प्यायला पाणी मिळेना.
10
तेव्हा इस्राएलाचा राजा म्हणाला, “अरेरे! ह्या तिघा राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणूनच परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.”
11
तेव्हा यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्या द्वारे आपल्याला परमेश्वराला प्रश्न करता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय?” इस्राएलाच्या राजाच्या सेवकांपैकी एकाने सांगितले, “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलीशा येथे आहे.”
12
यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होत असते.” मग इस्राएलाचा राजा, यहोशाफाट व अदोमाचा राजा हे त्याच्याकडे गेले.
13
अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” इस्राएलाचा राजा त्याला म्हणाला, “नाही, नाही; ह्या तीन राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.”
14
अलीशा म्हणाला, “ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ; येथे असलेला यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला मी मान देत नसतो तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते.
15
आता एखादा वाजंत्री घेऊन या.” वाजंत्री वाद्य वाजवत असताना परमेश्वराचा हस्त अलीशावर आला.
16
तो म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ह्या खोर्यात जिकडेतिकडे खळगे खणा.
17
परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पाऊस तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल; आणि तुम्ही, तुमची पाठाळे आणि जनावरे पाणी पितील.
18
परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे; तो मवाबी लोकांना तुमच्या हाती देईल.
19
तेव्हा तुम्ही प्रत्येक तटबंदी नगराचा व प्रत्येक निवडक नगराचा विध्वंस करा; चांगला वृक्ष असेल तेवढा तोडा; सर्व पाण्याचे कूप बुजवून टाका व दगड टाकून सर्व उत्तम शेतीची नासाडी करा.”
20
सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला.
21
राजे एकत्र होऊन आपल्याशी लढाई करण्यासाठी येत आहेत हे मवाबी लोकांनी ऐकले तेव्हा जितके मवाबी लढाईसाठी कंबर बांधण्यास लायक होते तितके व त्यांहून अधिक वयाचे सगळे एकत्र होऊन सीमेवर उभे राहिले.
22
दुसर्या दिवशी ते पहाटेस उठले आणि सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे मवाबी लोकांना ते दुरून रक्तासारखे भासले.
23
ते म्हणाले, “ते रक्तच आहे; त्या राजांचा नाश झाला आहे; त्यांनी एकमेकांना मारून टाकले आहे ह्यात संशय नाही. तर मवाब्यांनो, लूट करायला चला.”
24
मवाबी इस्राएलाच्या छावणीनजीक आले तेव्हा इस्राएलांनी उठून त्यांना मार दिला; आणि ते त्यांच्यापुढून पळाले; इस्राएल त्यांना मारत मारत त्यांच्या देशात शिरले.
25
त्यांनी नगरांचा विध्वंस केला; सर्व चांगल्या शेतांत प्रत्येक पुरुषाने दगड फेकले, त्यांनी ती दगडांनी भरून टाकली; पाण्याचे सर्व कूप बुजवले, सर्व चांगली झाडे तोडून टाकली; फक्त कीर-हरेसेथ येथे त्यांनी दगडांशिवाय काहीएक राहू दिले नाही; आणि गोफणदारांनी घेरून त्याचा विध्वंस केला.
26
युद्धात आपण अगदी जेर झालो असे मवाबाच्या राजाने पाहिले तेव्हा त्याने सातशे धारकरी बरोबर घेऊन अदोमाच्या राजाकडे जाण्यासाठी घेरा फोडण्याचा यत्न केला, पण त्याचे काही चालले नाही.
27
तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज ह्याला नेऊन तटावर त्याचा होम केला, ह्यावरून इस्राएलावर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25