bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Kings 14
2 Kings 14
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 15 →
1
इस्राएलाचा राजा यहोआहाज1 ह्याचा पुत्र योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी यहूदाचा राजा योवाश ह्याचा पुत्र अमस्या राज्य करू लागला.
2
तो राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यहोअदान होते, ती यरुशलेमेची होती.
3
परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी; तरी त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या तोडीचा तो नव्हता; त्याचा बाप योवाश ह्याच्या करणीप्रमाणे त्याची सगळी करणी होती.
4
पण उच्च स्थाने काही काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अजूनही त्या स्थानी यज्ञ करत व धूप जाळत.
5
त्याच्या हाती राजसत्ता बळकट झाली तेव्हा त्याचा बाप जो राजा त्याचा घात ज्या चाकरांनी केला होता त्यांना त्याने जिवे मारले.
6
पण त्या खून करणार्यांची मुलेबाळे त्याने जिवे मारली नाहीत; कारण मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, “पुत्रांसाठी पित्यांना, पित्यांसाठी पुत्रांना मारू नये; जो तो आपल्याच पापामुळे प्राणास मुकावा.”
7
त्याने क्षार खोर्यात अदोमाच्या दहा हजार लोकांना मारून टाकले; सेला नगर लढून घेतले व त्याचे नाव बदलून ते यकथेल असे ठेवले; आजवर ते नाव चालू आहे.
8
मग अमस्याने इस्राएलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज बिन येहू ह्याला जासुदांच्या हाती निरोप पाठवला की, “चल, आपण सामना करू.”
9
इस्राएलाचा राजा यहोआश ह्याने यहूदाचा राजा अमस्या ह्याला सांगून पाठवले की, “लबानोनातल्या काटेझुडपाने लबानोनातल्याच एका गंधसरूकडे मागणी केली की, ‘तुझी मुलगी माझ्या मुलास दे;’ लबानोनात असलेला एक वनपशू त्या वाटेने गेला व त्याने ते काटेझुडूप पायांखाली तुडवून टाकले.
10
तू अदोमाचा मोड केल्यामुळे तुझे हृदय उन्मत्त झाले आहे; त्याविषयी फुशारकी मारत आपल्या घरी बस; तू पतन पावशील व तुझ्याबरोबर यहूदा पतन पावेल; तर तू होऊन अरिष्टाला का आमंत्रण करत आहेस?”
11
अमस्या काही केल्या ऐकेना. तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआश चढाई करून गेला; तो व यहूदाचा राजा अमस्या ह्यांचा यहूदा देशातील बेथ-शेमेश येथे सामना झाला.
12
इस्राएलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने-त्याने आपापल्या डेर्याकडे पळ काढला.
13
इस्राएलाचा राजा यहोआश ह्याने यहूदाचा राजा अमस्या बिन यहोआश बिन अहज्या ह्याला बेथ-शेमेश येथे पकडले; त्याने यरुशलेमेस जाऊन एफ्राइमी वेशीपासून कोपरावेशीपर्यंत यरुशलेमेचा चारशे हात कोट पाडून टाकला.
14
सोने, रुपे, परमेश्वराच्या मंदिरात व राजभवनाच्या भांडारात त्याला सापडली तेवढी सगळी पात्रे व कैदी घेऊन तो शोमरोनास परत गेला.
15
यहोआशाने केलेली बाकीची कृत्ये, त्याचा पराक्रम, तो यहूदाचा राजा अमस्या ह्याच्याशी कसा लढला ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
16
यहोआश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला शोमरोनात इस्राएलाच्या राजांमध्ये मूठमाती देण्यात आली; त्याचा पुत्र यराबाम हा त्याच्या जागी राजा झाला.
17
इस्राएलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज ह्याच्या मृत्यूनंतर यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश हा पंधरा वर्षे जगला.
18
अमस्याची बाकीची कृत्ये यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत, नाहीत काय?
19
यरुशलेमेत त्याच्याविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला; पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले;
20
त्याला घोड्यांवर घालून आणले आणि यरुशलेमेत दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली.
21
मग सर्व यहूदी लोकांनी सोळा वर्षांच्या अजर्यास1 त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी राजा केले.
22
अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर अजर्याने एलाथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले.
23
यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा यराबाम बिन योवाश शोमरोनात राज्य करू लागला; त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले.
24
परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली त्यांचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडून दिली नाहीत.
25
इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने गथ-हेफेर येथील आपला सेवक योना बिन अमित्तय ह्या संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते त्याप्रमाणे यराबामाने हमाथाच्या घाटापासून अराबाच्या समुद्रापर्यंत इस्राएलाचा गेलेला मुलूख परत घेतला.
26
इस्राएलास दुःसह क्लेश होत आहेत असे परमेश्वराने पाहिले; बंदिवासात किंवा मोकळा असा कोणीही उरला नव्हता; इस्राएलाचा साहाय्यकारी असा कोणीच राहिला नव्हता.
27
ह्या नभोमंडळाखालून इस्राएलाची नावनिशाणी मी नाहीशी करीन असे परमेश्वर म्हणाला नव्हता, म्हणून त्याने योवाशाचा पुत्र यराबाम ह्याच्या द्वारे त्यांची सोडवणूक केली.
28
यराबामाची कृत्ये, त्याने जे केले ते सर्व, त्याचा पराक्रम, त्याची युद्धे व पूर्वी यहूदाच्या सत्तेत असलेली दिमिष्क व हमाथ ही त्याने कशी परत घेतली ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
29
मग यराबाम आपले पितर इस्राएलाचे राजे ह्यांच्या-जवळ जाऊन निजला आणि त्याचा पुत्र जखर्या हा त्याच्या जागी राजा झाला.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25