bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Kings 19
2 Kings 19
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 20 →
1
हे ऐकून हिज्कीयाने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
2
तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वृद्ध लोक ह्यांना गोणपाट नेसलेले असे आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे त्याने पाठवले.
3
ते जाऊन त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.
4
जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूराच्या राजाने रब-शाके ह्याच्याबरोबर जो निरोप पाठवला त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल, व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील, म्हणून जे काही शेष उरले आहे त्यासाठी आपण रदबदली करा.”
5
ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले.
6
तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, ‘अश्शूराच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत; त्यांनी तू घाबरू नकोस.
7
पाहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशाला परत जाईल व त्याच्याच देशात तो तलवारीने पडेल असे मी करीन.”’
8
नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराशी लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून त्याने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती.
9
मग “कूशाचा राजा तिर्हाका तुझ्याशी लढायला निघाला आहे” असे कोणी बोलताना त्याने ऐकले; हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,
10
“तुम्ही हिज्कीया राजाकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, ‘अश्शूराच्या राजाच्या हाती यरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.
11
अश्शूराच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा; त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय?
12
गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय?
13
हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, आणि सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे राजे हे कोठे आहेत?”’
14
हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले.
15
हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.
16
हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा आणि सन्हेरिबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक.
17
हे परमेश्वरा, खरोखर अश्शूराच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत;
18
त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते माणसांच्या हातांनी घडलेले काष्ठ व पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.
19
आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस.”
20
तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्याविषयी तू माझी प्रार्थना केलीस ती मी ऐकली आहे.
21
तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे: सीयोनाची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून, आपले मस्तक हालवते.
22
तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्या? इस्राएलाचा जो पवित्र त्यावर!
23
तू आपल्या जासुदांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, ‘मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.
24
मी खणून परस्थलांचे पाणी प्यालो; माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन.’
25
तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावेत?
26
ह्यासाठी त्यांतील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजीत झाले; शेतातील हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, वाढ पुरी होण्यापूर्वी करपलेले धान्य ह्यांसारखे ते झाले.
27
तुझे बसणेउठणे, तुझे जाणेयेणे व तुझा माझ्यावरचा संताप मला ठाऊक आहे.
28
माझ्यावरच्या तुझ्या संतापामुळे व माझ्या कानावर आलेल्या तुझ्या उन्मत्तपणामुळे मी तुझ्या नाकात वेसण व तुझ्या तोंडात लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.
29
आता तुला हे चिन्ह देतो: यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल; पुढल्या वर्षी त्याचा खोंडवा फुटेल तो खाल; तिसर्या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा.
30
यहूदा वंशातील निभावलेला शेष पुन्हा खाली मूळ धरील आणि वर फळ देईल.
31
कारण यरुशलेमेतून शेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल.
32
ह्यासाठी अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो ह्या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही.
33
ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल; त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
34
मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा उद्धार होईल असे ह्याचे संरक्षण करीन.”
35
त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!
36
मग अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.
37
तेथे तो आपला देव निस्रोख ह्याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याचा तलवारीने वध केला आणि ते अराराट देशात पळून गेले; मग एसर-हद्दोन त्याच्या जागी राजा झाला.
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 20 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Recommended Reading
Commentary
2 Kings Commentaries
→
Devotional
2 Kings Devotional Guide
→
Get This Bible
Re-edited Study Bible
→