bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Kings 23
2 Kings 23
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 24 →
1
मग राजाने यहूदातील व यरुशलेमेतील सर्व वडील जनांना बोलावणे पाठवून जमा केले.
2
यहूदा येथील सर्व लोक, सर्व यरुशलेमेतले रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध ह्यांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिराकडे गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली.
3
मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, “मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन, ह्या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन.” तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला.
4
मग राजाने हिल्कीया मुख्य याजक, दुसर्या प्रतीचे याजक आणि द्वारपाळ ह्यांना आज्ञा केली की बआल मूर्ती, अशेरामूर्ती व नक्षत्रगण ह्यांच्यासाठी जी पात्रे केली आहेत ती सर्व परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढा. त्याने ती सर्व पात्रे यरुशलेमेच्या बाहेर किद्रोनच्या मैदानात जाळून त्यांची राख बेथेल येथे पाठवली.
5
जितके पुजारी यहूदाच्या राजांनी यहूदी नगरांच्या उच्च स्थानी व यरुशलेमेच्या आसपासच्या उच्च स्थानी धूप जाळण्यासाठी नेमले होते ते आणि जे कोणी बआल, सूर्य, चंद्र, राशिचक्र व नक्षत्रगण ह्यांना धूप जाळत होते ते सर्व राजाने काढून टाकले.
6
त्याने परमेश्वराच्या मंदिरातून अशेरामूर्ती बाहेर काढली व यरुशलेमेबाहेर किद्रोन ओहोळाजवळ नेऊन जाळून टाकली, पायांनी तुडवून तिचे चूर्ण केले व ते साधारण लोकांच्या कबरांवर फेकून दिले.
7
त्याप्रमाणेच परमेश्वराच्या मंदिराला लागून पुरुषगमन करणार्यांची घरे होती ती त्याने मोडून टाकली; त्यांत स्त्रिया अशेरामूर्तींसाठी पडदे विणत असत.
8
त्याने यहूदाच्या सर्व नगरांतील याजकांना बोलावणे पाठवले; गेबापासून बैर-शेबापर्यंत असलेल्या ज्या उच्च स्थानीं ते याजक धूप जाळत असत ती त्याने भ्रष्ट केली; आणि नगराधिकारी यहोशवा ह्याच्या नगराच्या वेशीत डाव्या हाताला उच्च स्थाने होती ती सर्व मोडून टाकली.
9
तरीपण उच्च स्थानांचे याजक यरुशलेमेतील परमेश्वराच्या वेदीजवळ आले नाहीत; ते आपल्या भाऊबंदांमध्ये राहून बेखमीर भाकरी खात असत.
10
नंतर, कोणी आपला पुत्र अथवा कन्या ह्यांचा अग्नीत होम करून त्याला मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोमपुत्रांच्या खोर्यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले.
11
जे घोडे यहूदाच्या राजांनी सूर्याला वाहून परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी नथनमेलेक नावाच्या खोजाच्या बाहेरल्या बाजूच्या कोठडीजवळ ठेवले होते, ते त्याने काढून टाकले आणि सूर्याचे रथ अग्नीने जाळून टाकले.
12
आहाजाच्या माडीच्या धाब्यावर ज्या वेद्या यहूदाच्या राजांनी केल्या होत्या आणि मनश्शेने परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत ज्या वेद्या केल्या होत्या, त्या राजाने मोडूनतोडून टाकल्या आणि त्यांची धूळमाती त्याने किद्रोन ओहोळात फेकून दिली.
13
आणि इस्राएलाचा राजा शलमोन ह्याने यरुशलेमेच्या पूर्वेस आणि विध्वंसगिरी नावाच्या पहाडाच्या दक्षिणेस सीदोन्यांची अमंगळ देवी अष्टोरेथ, मवाबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम ह्यांच्याप्रीत्यर्थ जी उच्च स्थाने बांधली होती ती राजाने भ्रष्ट केली.
14
त्याने तेथील मूर्तिस्तंभ मोडून त्यांचे तुकडे केले, तेथील अशेरामूर्ती फोडून टाकल्या व त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेवली.
15
मग बेथेल येथे जी वेदी होती आणि जे उच्च स्थान इस्राएलाकडून पाप करवणारा नबाटपुत्र यराबाम ह्याने बांधले होते, ती वेदी व ते उच्च स्थान त्याने पाडून टाकले; ते उच्च स्थान जाळून टाकले, त्याचा भुगा केला व अशेरामूर्ती जाळून टाकल्या.
16
योशीयाने वळून पाहिले तर डोंगरावरील कबरा त्याच्या दृष्टीस पडल्या; त्याने माणसे पाठवून कबरांतून हाडे बाहेर काढून आणवली आणि ती त्या वेदीवर जाळून ती भ्रष्ट केली. ह्या गोष्टी विदित करणार्या देवाच्या माणसाने देवाचे जे वचन कळवले होते त्याप्रमाणे हे घडले.
17
मग त्याने विचारले, “माझ्यासमोर हे जे स्मारक दिसत आहे ते कोणाचे?” नगरातील लोकांनी त्याला सांगितले की, “तू ह्या बेथेलच्या वेदीचे जे काही केले त्याविषयी ज्या देवाच्या माणसाने यहूदातून येऊन विदित केले होते त्याचे हे थडगे.”
18
तो म्हणाला, “त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका, त्याच्या अस्थी कोणी काढू नका.” त्यांनी त्याच्या अस्थी शोमरोनाहून आलेल्या संदेष्ट्याच्या अस्थींबरोबर तशाच राहू दिल्या.
19
जेवढी उच्च स्थाने शोमरोनातील नगरांत बांधून इस्राएलाच्या राजांनी परमेश्वरास संताप आणला होता ती सर्व योशीयाने काढून टाकली; त्याने बेथेल येथे केले होते त्याप्रमाणेच त्यांचे केले.
20
तेथल्या उच्च स्थानांचे याजक होते तितक्यांना त्याने त्या वेद्यांवर बली दिले व त्यांच्यावर माणसांची हाडे जाळली. मग तो यरुशलेमेस परत गेला.
21
नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा दिली की, “ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.”
22
असा वल्हांडण सण इस्राएलाचे शास्ते शासन करत होते त्यांच्या काळापासून व इस्राएलाचे राजे व यहूदाचे राजे ह्यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता;
23
योशीया राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळण्यात आला.
24
ह्याखेरीज हिल्कीया याजक ह्याला परमेश्वराच्या मंदिरात जो ग्रंथ सापडला होता त्यातील नियमशास्त्राची वचने स्थापित करावीत म्हणून यहूदा देशात व यरुशलेमेत दैवज्ञ व चेटकी आणि कुलदेवता, मूर्ती आदिकरून ज्या अमंगळ वस्तू योशीयाच्या नजरेस पडल्या त्या त्याने काढून टाकल्या.
25
मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या सर्व मनाने, आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व बलाने परमेश्वरभजनी लागणारा योशीयासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही.
26
एवढे त्याने केले तरीदेखील मनश्शेने जी संतापजनक कृत्ये करून परमेश्वराला संतप्त केले होते त्यामुळे परमेश्वराचा जो महाक्रोध यहूदावर भडकला होता तो शमला नाही.
27
परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलास जसे आपल्या नजरेपुढून दूर केले तसेच यहूदासही दूर करीन; हे यरुशलेम नगर मी निवडले होते व ह्या मंदिरात माझ्या नावाचा निवास होईल असे मी म्हणालो होतो, त्याचाही मी त्याग करीन.”
28
योशीयाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
29
त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो-नखो हा अश्शूराच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असताना योशीया राजा त्याच्यावर चालून गेला; योशीया मगिद्दो येथे त्याच्यासमोर आला तेव्हा त्याला त्याने ठार केले.
30
त्याच्या चाकरांनी त्याचे प्रेत रथावर घालून मगिद्दो येथून यरुशलेमेस पोहचवले; त्याने स्वतः केलेल्या थडग्यात त्यांनी त्याला मूठमाती दिली. मग देशातील लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला अभिषेक करून त्याच्या बापाच्या जागी राजा केले.
31
यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले; त्याच्या आईचे नाव हमूटल; ही लिब्नाकर यिर्मया ह्याची कन्या.
32
त्याच्या वाडवडिलांनी केले होते त्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
33
यरुशलेमेत त्याला राज्य करता येऊ नये म्हणून फारो-नखो ह्याने हमाथ देशातले रिब्ला येथे त्याला बेड्या घालून ठेवले आणि त्याच्या देशावर शंभर किक्कार1 चांदी व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.
34
मग फारो-नखो ह्याने योशीयाचा पुत्र एल्याकीम ह्याला त्याच्या बापाच्या जागी राजा केले, त्याने त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले; यहोआहाज मिसर देशाला गेल्यावर मरण पावला.
35
यहोयाकीम ह्याने फारोला सोने व रुपे दिले; पण हा पैसा फारोच्या हुकमाप्रमाणे देण्यासाठी त्याला देशावर कर बसवावा लागला; देशातल्या सर्व लोकांवर कर बसवून फारो-नखो ह्याला देण्यासाठी त्याने प्रत्येकाकडून सोने व रुपे वसूल केले.
36
यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव जबूदा; ती रुमा येथला पदाया ह्याची कन्या.
37
त्याने आपल्या पूर्वजांच्या सर्व करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 24 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Recommended Reading
Commentary
2 Kings Commentaries
→
Devotional
2 Kings Devotional Guide
→
Get This Bible
Re-edited Study Bible
→