bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Deuteronomy 16
Deuteronomy 16
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 17 →
1
अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले.
2
परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी शेरडेमेंढरे आणि गाईबैल ह्यांतून वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पावा.
3
त्याच्या मांसाबरोबर खमिराची भाकर खाऊ नये; सात दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दु:खस्मारकाची भाकर खावी, कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास; ह्यामुळे मिसर देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील.
4
सात दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुझ्याजवळ खमीर दिसता कामा नये; तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये.
5
तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यांतील कोणत्याही नगरात वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करता येईल असे नाही,
6
तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथेच ज्या समयी तू मिसर देशातून निघालास त्या समयी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी, संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करावास.
7
आणि तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तू तो शिजवून खावास; मग सकाळी आपल्या डेर्यात परत जावेस.
8
सहा दिवस तू बेखमीर भाकरी खाव्यास, आणि सातव्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये.
9
तू सात सप्ताह मोज; उभ्या पिकाला विळा लावल्यापासून सात सप्ताह मोज.
10
मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सप्ताहांचा सण पाळ.
11
तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.
12
तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ.
13
आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर तू मांडवांचा सण सात दिवस पाळावास;
14
ह्या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्यासह तू आनंदोत्सव करावास.
15
जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावास, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यांत तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल.
16
तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणांत तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे; पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये;
17
तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे.
18
तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे तू न्यायाधीश व अंमलदार नेमावेस; त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.
19
विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करते.
20
नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील.
21
तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ जी वेदी बांधशील तिच्याजवळ अशेराची काष्ठमूर्ती उभारू नकोस.
22
तसेच पूजास्तंभ उभारू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 17 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34