bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Deuteronomy 26
Deuteronomy 26
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 25
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 27 →
1
तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील,
2
आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.
3
आणि त्या वेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण: ‘तुझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे मी जाहीर करतो की, परमेश्वराने आम्हांला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे.’
4
मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी.
5
तेव्हा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमक्ष असे म्हण: ‘माझा मूळ पुरुष मरता मरता वाचलेला1 एक अरामी होता; तो मिसर देशात गेला व तेथे आपल्या लहानशा परिवारासह उपरा म्हणून राहिला; त्याच्यापासून तेथे एक महान, पराक्रमी व दाट वस्तीचे राष्ट्र उत्पन्न झाले;
6
तेथे मिसरी लोकांनी आम्हांला निर्दयतेने वागवले, गांजले व आम्हांला वेठीस लावले;
7
पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली; आणि आमचे दु:ख, कष्ट व छळ पाहिला.
8
तेव्हा परमेश्वराने पराक्रमी बाहूने व उगारलेल्या हाताने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार ह्यांच्या योगे आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले;
9
आणि आम्हांला ह्या स्थळी आणून पोहचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हांला दिला.
10
आता, हे परमेश्वरा, जमिनीचे प्रथमउत्पन्न, तू मला दिले आहेस त्यातले काही मी तुला आणले आहे.’ मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल;
11
आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर; तुझ्याबरोबरचा लेवी व तुझ्याबरोबरचा उपरा ह्यांनीही त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा.
12
तिसर्या वर्षी, म्हणजे दशमांश वेगळा काढण्याच्या वर्षी, जेव्हा तू आपल्या उत्पन्नाचा सबंध दशमांश वेगळा काढण्याचे संपवशील तेव्हा तो तू लेव्याला, उपर्याला, अनाथाला व विधवेला दे म्हणजे ते तुझ्या गावात तो खाऊन तृप्त होतील;
13
मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर असे म्हण: ‘पवित्र केलेल्या वस्तू मी आपल्या घरातून काढल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या मी लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत; मी तुझ्या कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही किंवा त्या मी विसरलोही नाही.
14
मी सुतकी असताना ह्यांतले काही खाल्ले नाही, अथवा अशुद्ध असताना ह्यांतले काही काढून टाकले नाही, अथवा मृतांसाठी त्यांतले काही दिले नाही. मी आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द मानला आहे; मी तुझ्या सर्व आज्ञांप्रमाणे केले आहे.
15
तू आपल्या पवित्र निवासातून, स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या इस्राएल प्रजेला आशीर्वाद दे आणि तू आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे जो देश तू आम्हांला दिला आहे त्या ह्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशाला बरकत दे.’
16
हे विधी व नियम तू पाळावेस अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ.
17
परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहेस की, मी तुझ्या मार्गांनी चालेन, तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन.
18
आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे की, ‘तुला सांगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाला आहेस; तू माझ्या सर्व आज्ञा पाळ,
19
म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.”
← Chapter 25
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 27 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34