bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Deuteronomy 21
Deuteronomy 21
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 22 →
1
तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून घ्यायला देत आहे तेथे उघड्यावर कोणी मनुष्य मारून टाकलेला आढळला आणि त्याला कोणी मारले हे कळले नाही,
2
तर तुझ्यातील वडीलवर्ग व न्यायाधीश ह्यांनी तेथे जाऊन त्या प्रेताच्या सभोवार असलेल्या प्रत्येक गावाचे अंतर मोजावे;
3
मग जो गाव त्या प्रेताच्या सर्वांत जवळचा असेल त्यातल्या वडीलवर्गाने कामास कधी न लावलेली अथवा कधी न जुंपलेली अशी एक कालवड घ्यावी;
4
आणि ज्यात नांगरणी पेरणी होत नसते व ज्यात पाणी सतत वाहत असते अशा खोर्यात तिची मान मोडावी;
5
तेव्हा लेवी वंशातल्या याजकांनी पुढे व्हावे; कारण त्यांनी परमेश्वराची सेवा करावी, त्याच्या नावाने आशीर्वाद द्यावा, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वादाचा व मारामारीचा निर्णय व्हावा ह्यासाठी तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना निवडले आहे.
6
मग त्या मारून टाकलेल्या मनुष्याच्या सर्वांत जवळच्या असलेल्या नगरातील वडीलवर्गाने त्या खोर्यात मान मोडून टाकलेल्या कालवडीवर आपले हात धुवावेत;
7
आणि स्पष्ट म्हणावे की, ‘आमच्या हातून हा रक्तपात झाला नाही आणि आम्ही डोळ्यांनी पाहिला नाही.
8
हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस त्यांना क्षमा कर; तुझ्या इस्राएल लोकांमध्ये निरपराध माणसाच्या हत्येचा दोष राहू देऊ नकोस. ह्या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.’
9
ह्या प्रकारे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करून निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू आपल्यातून काढून टाकावास.
10
तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला गेलास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या हाती दिले आणि तू त्यांना बंदिवान केलेस,
11
आणि बंदिवानांत एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहित झालास, तिला बायको करून घेण्याची तुला इच्छा झाली;
12
तर तू तिला आपल्या घरी घेऊन जावे आणि तिचे डोके मुंडावे आणि तिची नखे काढावीत.
13
मग तिने आपल्या परस्वाधीन स्थितीतली वस्त्रे टाकून तुझ्या घरी एक महिनाभर आपल्या आईबापासाठी शोक करावा; ह्यानंतर तू तिच्यापाशी जावे म्हणजे तू तिचा पती होशील व ती तुझी पत्नी होईल.
14
ती तुला आवडेनाशी झाली तर तिला वाटेल तिकडे जाऊ दे, पण तिच्याबद्दल पैसा घेऊन तिला मुळीच विकू नकोस, तिला दासीप्रमाणे वागवू नकोस, कारण तू तिला भ्रष्ट केले आहेस.
15
एखाद्या पुरुषाला एक आवडती व एक नावडती अशा दोन बायका असल्या आणि त्या आवडत्या व नावडत्या अशा दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असले आणि नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असला,
16
तर तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्यांचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असताना त्याच्या ऐवजी आवडतीच्या पुत्राला ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने देऊ नये.
17
पण नावडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याने त्याला आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा; कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याचाच आहे.
18
एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानत नसला, आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला,
19
तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडीलवर्गासमोर न्यावे.
20
आणि त्यांनी गावच्या वडीलवर्गाला सांगावे, ‘हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे; हा आमचे ऐकत नाही; हा खादाड व मद्यपी आहे.’
21
मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्राएल लोक हे ऐकून भितील.
22
एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांगले,
23
तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नयेस, पण त्याच दिवशी तू त्याला अवश्य पुरावेस; कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो; तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे तो देश विटाळवू नकोस.
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 22 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34