bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Deuteronomy 23
Deuteronomy 23
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 24 →
1
जो भग्नांड आहे अथवा ज्याचे लिंगच्छेदन झाले आहे त्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये.
2
जारजाने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये.
3
अम्मोनी आणि मवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये;
4
कारण तुम्ही मिसर देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत, एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून अराम-नहराईम1 येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले.
5
तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही; उलट तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्याकरता त्या शापाचा आशीर्वादच केला, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची तुझ्यावर प्रीती होती.
6
तू आपल्या हयातीत त्याचे क्षेमकुशल कधीही चिंतू नकोस.
7
अदोम्याचा तुला वीट नसावा, कारण तो तुझा बंधू होय; मिसर्यांचा तुला वीट नसावा, कारण तू त्याच्या देशात उपरा होतास.
8
त्यांच्या तिसर्या पिढीत जन्मलेल्या लोकांना परमेश्वराच्या मेळ्यास येण्याची परवानगी आहे.
9
तुझ्या शत्रूंशी लढाई करण्यासाठी बाहेर पडून तू तळ देशील तेव्हा सर्व दुष्कृत्यांपासून दूर राहा.
10
जर कोणा पुरुषाला रात्री काही अशुद्धता आपोआप प्राप्त झाली तर त्याने छावणीबाहेर जावे, त्याने छावणीच्या आत येऊ नये;
11
पण संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे आणि सूर्यास्तानंतर छावणीच्या आत यावे.
12
तुला बहिर्दिशेस जाण्यासाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी;
13
आणि तुझ्या हत्यारांमध्ये एक कुदळ असावी, तू बहिर्दिशेस बसण्यापूर्वी कुदळीने खणून खड्डा करावा, नंतर आपला मळ झाकून टाकावास.
14
कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो, म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावीस, नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल.
15
एखादा दास आपल्या धन्यापासून पळून जाऊन तुला शरण आला तर त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नकोस,
16
त्याने आपल्या पसंतीनुसार निवडलेल्या ठिकाणी तुझ्या एखाद्या गावात तुझ्याबरोबर राहावे; त्याला जाच करू नकोस.
17
इस्राएलकन्यांपैकी कोणीही वेश्या2 होऊ नये, आणि इस्राएलपुत्रांपैकी कोणालाही पुंमैथुनास वाहू नये.
18
वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या3 प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नकोस, कारण ह्या दोन्हींचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.
19
आपल्या बांधवांशी व्याजबट्ट्याचा व्यवहार करू नकोस, पैशावर व्याज, अन्नधान्यावर वाढ किंवा इतर कोणत्याही पदार्थावर वाढीदिढी करू नकोस.
20
वाटल्यास परदेशीयाशी वाढीदिढीचा व्यवहार कर, पण आपल्या बांधवाशी करू नकोस, म्हणजे जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे ज्या ज्या कामाला तू हात घालशील त्यात तुझा देव परमेश्वर तुला आशीर्वाद देईल.
21
तू आपला देव परमेश्वर ह्याला नवस करशील तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर तुला त्याचा अवश्य जाब विचारील; विलंब लावल्यास तुला पाप लागेल.
22
तथापि तू नवस न करण्याचे ठरवलेस तर तुला पाप लागणार नाही.
23
ज्या अर्थी तू आपल्या मुखाने वचन देऊन आपला देव परमेश्वर ह्याला स्वखुशीने नवस केला आहेस त्या अर्थी तुझ्या मुखातून निघालेले वचन काळजीपूर्वक पाळ.
24
आपल्या शेजार्याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नकोस.
25
आपल्या शेजार्याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजार्याच्या उभ्या पिकास विळा लावू नकोस.
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 24 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34