bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Deuteronomy 32
Deuteronomy 32
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 31
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 33 →
1
“अहो आकाशांनो, लक्ष द्या मी बोलत आहे; पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको.
2
पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.
3
मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन; आमच्या देवाची महती वर्णा.
4
तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.
5
ते बिघडले आहेत, ते त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे; ही विकृत व कुटिल पिढी आहे.
6
अहो मूढ व निर्बुद्ध लोकहो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडवले तोच तुझा पिता ना? त्यानेच तुला निर्माण केले व स्थापले.
7
पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण, आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील; आपल्या वडील जनांस विचार ते तुला सांगतील.
8
जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली, जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसवले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या;
9
कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग.
10
तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.
11
गरुड पक्षीण आपले कोटे हलवते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले1 पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखांवर वाहते,
12
त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालवले, त्याच्याबरोबर परका देव नव्हता.
13
त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानांवरून मिरवत नेले, त्याने शेतात उपज खाल्ला; त्याने त्याला खडकातील मध, आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले;
14
गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकरांची चरबी, बाशानाचे एडके व बकरे, उत्तम गव्हाचे सत्त्व, हे त्याला दिले; द्राक्षांची लालभडक मदिरा तू प्यालास.
15
पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.
16
त्यांनी अन्य देवांच्या मागे लागून त्याला ईर्ष्येस पेटवले. अमंगळ कृत्ये करून त्याला चीड आणली.
17
देव नाहीत अशा भुतांना, जे अलीकडेच नवीन निघाले आहेत, ज्यांना तुमचे पूर्वज भीत नव्हते, अशा अपरिचित देवांना त्यांनी बली अर्पण केले.
18
तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाहीस, व तुला जन्म देणार्या देवाला तू विसरलास.
19
हे पाहून परमेश्वराला त्यांचा वीट आला, कारण त्याचे पुत्र व कन्या ह्यांनी त्याला चीड आणली.
20
मग तो म्हणाला, ‘मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन; कारण ही पिढी अतिशय कुटिल आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत.
21
देव नाही अशाच्या योगे त्यांनी मला ईर्ष्येस पेटवले, व्यर्थ वस्तूंच्या योगे त्यांनी मला चिडवले; म्हणून ज्यांचे राष्ट्र नव्हे अशांच्या योगे मी त्यांना ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे त्यांना चिडवीन.
22
कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.
23
मी त्यांच्यावर अरिष्टांची रास रचीन, त्यांच्यावर मी आपले बाण सोडीन;
24
ते भुकेने कासावीस होतील, प्रखर तापाने व भयंकर मरीने ग्रस्त होतील; श्वापदांचे दात व जमिनीवर सरपटणार्या प्राण्यांचे विष मी त्यांच्यावर पाठवीन.
25
बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो.
26
‘मी त्यांची दूरवर पांगापांग करीन, मानवातून त्यांची आठवणच बुजवीन’ असे मी म्हणालो असतो,
27
पण शत्रूच्या खिजवण्याला मी भ्यालो; त्यांच्या विरोधकांनी ह्याचा भलताच अर्थ लावला असता; ते म्हणाले असते की, ‘आमच्याच हाताने पराक्रम केला आहे. ही काही परमेश्वराची कृती नव्हे.’
28
हे राष्ट्र विचारशून्य आहे, ह्यांना समजच नाही.
29
ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते!
30
त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!
31
त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत.
32
त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेपासून निघाली आहे, ती गमोर्यांच्या मळ्यातली आहे, त्यांची द्राक्षे विषारी आहेत; त्यांचे घोस कडू आहेत.
33
त्यांचा द्राक्षारस म्हणजे सर्पाचे विषच; भुजंगाचे जालीम गरळच आहे.
34
‘हे माझ्या संग्रही नाही काय? माझ्या भांडारात ते मोहरबंद केलेले नाही काय?
35
सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’
36
आपल्या लोकांचा आश्रय तुटला आहे, बद्ध किंवा मुक्त असा कोणी उरला नाही, हे परमेश्वर पाहील तेव्हा तो त्यांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकाचा कळवळा येईल.
37
मग तो म्हणेल, ‘त्यांचे देव कोठे आहेत? ज्याच्यावर त्यांनी भिस्त ठेवली तो त्यांचा दुर्ग कोठे आहे?
38
त्यांच्या यज्ञातली चरबी खाणारे, त्यांच्या पेयार्पणातला द्राक्षारस पिणारे देव कोठे आहेत? त्यांनी आता उठून तुम्हांला साहाय्य करावे व तुम्हांला आश्रय द्यावा.
39
‘आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाही; प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे. मी घायाळ करतो आणि मीच बरे करतो; माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.
40
मी आपला बाहू आकाशाकडे उभारून म्हणतो, माझ्या सनातन जीविताची शपथ,
41
मी आपली चमकणारी तलवार पाजळली, मी न्याय हाती घेतला, तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन, माझ्या वैर्यांचे उसने फेडीन.
42
वधलेल्यांचे, पाडाव केलेल्यांचे आणि शत्रूंच्या केसाळ मस्तकांचे रक्त पाजून मी माझ्या बाणांना मस्त करीन; माझी तलवार मांस भक्षील.’
43
राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा; कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील, तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करील.”
44
ह्या गीताचे सर्व शब्द मोशेने नूनाचा मुलगा होशा1 ह्याला बरोबर घेऊन लोकांना ऐकवले.
45
ह्याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने सर्व इस्राएल लोकांना सांगण्याचे संपवले;
46
मग तो त्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी आज मी तुम्हांला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा; ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा.
47
ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय. तुम्ही यार्देन ओलांडून ज्या देशाचे वतन करून घ्यायला जाणार आहात तेथे हिच्याच योगे चिरकाळ राहाल.”
48
त्याच दिवशी परमेश्वर मोशेला म्हणाला,
49
“मवाब देशात यरीहोसमोर अबारीम पर्वताचे नबो म्हणून जे शिखर आहे त्यावर चढ, आणि जो कनान देश इस्राएल लोकांना वतन म्हणून मी देत आहे तो तेथून पाहा;
50
तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर मृत्यू पावून स्वजनांस मिळाला, तसाच तूही ह्या डोंगरावर चढून जाशील व तेथे मृत्यू पावून स्वजनांस मिळशील.
51
कारण त्सीन रानात कादेशच्या मरीबा नावाच्या झर्याजवळ तुम्ही इस्राएल लोकांदेखत माझा विश्वासघात केला व त्यांच्यासमोर मला पवित्र मानले नाही.
52
ह्यामुळे जो देश मी इस्राएल लोकांना देत आहे तो तू समोर पाहशील; पण तेथे तुझे जाणे होणार नाही.”
← Chapter 31
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 33 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34