bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Song of Solomon 1
Song of Solomon 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 2 →
1
शलमोनाने रचलेले गीतरत्न.
2
तो मला मुखचुंबन देवो; तुझे प्रेम द्राक्षारसाहून मधुर आहे.
3
तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो; तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय; म्हणूनच कुमारी तुझ्यावर प्रेम करतात.
4
माझ्या चित्ताचे आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्यामागून धावत येऊ. राजाने मला अंत:पुरी आणले आहे. आम्ही तुझ्या ठायी आनंदोत्सव करू; तुझे प्रेम द्राक्षारसाहून अधिक वर्णू; त्या एकनिष्ठपणे तुझ्यावर प्रीती करीत आहेत.
5
यरुशलेमनिवासी कन्यांनो, मी काळीसावळी पण सुरूप आहे. केदाराच्या तंबूसारखी, शलमोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे.
6
मी काळीसावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. माझे सहोदर बंधू माझ्यावर संतप्त झाले; त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करण्यासाठी ठेवले; पण माझ्या स्वत:च्या मळ्याची राखण मी केली नाही.
7
माझ्या प्राणसख्या, मला सांग: तू आपला कळप कोठे चारतोस? दुपारी तो कोठे बसवतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत राहावे?
8
हे परम सुंदर स्त्रिये, तुला हे ठाऊक नसेल तर तू त्या शेरडामेंढरांच्या पावलांमागे पाऊल टाकून जा; मेंढपाळांच्या राहुट्यांनजीक आपली करडे चारत राहा.
9
माझ्या सखे, मी तुला फारोच्या रथाच्या घोडीसारखा लेखतो.
10
गोफांनी तुझे गाल, रत्नहारांनी तुझा कंठ सुरेख दिसत आहे.
11
आम्ही तुझ्यासाठी चांदीचे टिके लावलेले सोन्याचे गोफ करू.
12
राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
13
माझा वल्लभ माझ्या कुचद्वयामध्ये ठेवलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.
14
माझा वल्लभ मला एन-गेदी येथील द्राक्षीच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे.
15
माझ्या सखे, तू सुंदर आहेस; अगे, तू सुंदर आहेस! तुझे नेत्र कपोतांसारखे आहेत.
16
माझ्या वल्लभा, तूच सुरूप आहेस; तूच मनोहर आहेस; आमचा मंचक पर्णशय्या आहे.
17
आमच्या घराच्या तुळया गंधसरूच्या आहेत; आमची तक्तपोशी सुरूची आहे.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8