bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Song of Solomon 2
Song of Solomon 2
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 3 →
1
मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे; मी खोर्यातले भुईकमळ आहे.
2
काटेरी झुडपांमध्ये जसे भुईकमळ तशी इतर युवतींमध्ये माझी सखी आहे.
3
वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले.
4
त्याने मला आपल्या पानगृहात आणले; त्याने माझ्यावर प्रेमध्वजा फडकावली.
5
मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम द्या; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे;
6
त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे; त्याचा उजवा हात मला आलिंगत आहे.
7
यरुशलेमाच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका; तो राहील तितका वेळ राहू द्या.
8
हा माझ्या वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या मारत, टेकड्यांवरून दौडत येत आहे!
9
माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे; पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे; तो खिडकीतून डोकावत आहे तो झरोक्यांतून पाहत आहे.
10
माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल.
11
पाहा, हिवाळा गेला आहे; पाऊस संपून गेला आहे;
12
पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत; पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे; आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे.
13
अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये.
14
अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.
15
द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणार्या खोकडांना, त्या लहान कोल्ह्यांना आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.”
16
माझा वल्लभ माझा, व मी त्याची; तो आपला कळप भुईकमळांत चारत आहे.
17
शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा. माझ्या वल्लभा, हरिणाप्रमाणे, मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोगपर्वतांवर फीर.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8