bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Song of Solomon 3
Song of Solomon 3
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 4 →
1
रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली; मी त्याला चोहीकडे पाहिले; पण तो मला आढळला नाही.
2
माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून व गल्ल्यांतून करावा; मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही.
3
नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; मी त्यांना विचारले, “माझा प्राणप्रिय तुम्हांला कोठे आढळला काय?”
4
त्यांना सोडून मी अंमळ पुढे जाते तोच माझा प्राणप्रिय मला भेटला; मी त्याला धरून ठेवले; मी त्याला आपल्या मातृगृही आपल्या जननीच्या कोठडीत आणीपर्यंत सोडले नाही.
5
यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते, माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका. तो राहील तितका वेळ राहू द्या.
6
गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?
7
पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत.
8
ते सर्व खड्गधारी व युद्धप्रवीण आहेत; रात्रीच्या समयी प्राप्त होणार्या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेला तलवार लटकत आहे.
9
शलमोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करवला आहे.
10
त्याचे दांडे रुप्याचे आहेत; त्याची पाठ सोन्याची आहे; त्याची गादी जांभळ्या रंगाची आहे; त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने विभूषित केला आहे.
11
सीयोननिवासी कन्यांनो, बाहेर या, शलमोन राजाला पाहा; त्याच्या विवाहदिवशी, त्याच्या मनाला उल्लास झाला त्या दिवशी, त्याच्या मातेने त्याला घातलेल्या मुकुटाने मंडित झालेला, असा हा पाहा.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8