bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Song of Solomon 5
Song of Solomon 5
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 6 →
1
हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.
2
मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”
3
“मी पेहराव उतरवला आहे, तो पुन्हा कसा लेऊ? मी पाय धुतले आहेत, ते पुन्हा कसे मळवू?”
4
माझ्या वल्लभाने झरोक्यातून आपला हात आत घातला, तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.
5
मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातांना लागला, माझ्या बोटांवरून त्याचा द्रव थिबकला.
6
मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले, आणि पाहते तर तो निघून गेला होता. तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता; मी त्याचा शोध केला, पण तो सापडला नाही; मी त्याला हाका मारल्या पण त्याने उत्तर दिले नाही.
7
नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; त्यांनी मला मार देऊन घायाळ केले; तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला.
8
यरुशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हांला शपथ घालून विनंती करते की माझा वल्लभ तुम्हांला आढळला तर त्याला सांगा मी प्रेमज्वराने पीडित आहे.
9
स्त्रियांतल्या परम सुंदरी, तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे? तू आम्हांला शपथ घालतेस तर तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे?
10
माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे; तो लाखात मोहरा आहे.
11
त्याचे शिर बावनकशी सोन्यासारखे आहे; त्याची झुलपे कुरळी व डोमकावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहेत.
12
त्याचे डोळे ओढ्याच्या काठांवरील होल्यांसारखे आहेत; ते दुधात डुंबत असून नीट जडलेले आहेत.
13
त्याचे गाल सुगंधोत्पादक वनस्पतींचे ताटवे आहेत. त्याचे ओठ कमलांप्रमाणे असून त्यांतून गंधरस स्रवतो.
14
त्याचे हात पुष्परागाने खचलेल्या सुवर्णनलिकाच होत; त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंतफलकासारखे आहे.
15
त्याचे पाय सुवर्णाच्या कोंदणात बसवलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत. त्याचा बांधा लबानोनासारखा आहे; तो गंधसरूसारखा उमदा आहे;
16
त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8