bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Song of Solomon 7
Song of Solomon 7
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 8 →
1
हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत.
2
तुझी नाभी वाटोळा गरगरीत पेलाच आहे; त्यात मिश्रित द्राक्षारसाची वाण नाही, तुझे उदर सभोवती भुईकमळे लावलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
3
तुझे कुचद्वय हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखे आहे.
4
तुझा कंठ हस्तदंती मनोर्यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे.
5
तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे.
6
हे प्रिये, मनोरम विषयांमध्ये तू किती सुंदर, किती चित्ताकर्षक आहेस!
7
तुझा हा बांधा तालवृक्षासारखा आहे; तुझे कुच द्राक्षांच्या घोसांसारखे आहेत.
8
मी म्हटले, मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन; तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या घोसांसमान व्हावेत, आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान व्हावा.
9
तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो.
10
मी आपल्या वल्लभाची आहे; त्याचे मन माझ्यावर बसले आहे.
11
माझ्या वल्लभा, ऊठ, आपण गांवढ्यात जाऊ; खेड्यात रात्र घालवू.
12
आपण प्रातःकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ; तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहू; तेथे मी आपले प्रेम तुला अर्पण करीन.
13
पुत्रदात्रीचा सुगंध सुटला आहे; आमच्या दारांवर नाना प्रकारची नव्याजुन्या बारांची उत्तम फळे आहेत; हे माझ्या वल्लभा, ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8