bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
John 1
John 1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 2 →
1
प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
2
तोच प्रारंभी देवासह होता.
3
सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीही झाले नाही.
4
त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते.
5
तो प्रकाश अंधारात प्रकाशतो व अंधाराने त्याला ग्रासले नाही.
6
देवाने एक मनुष्य पाठवला. त्याचे नाव योहान असे होते.
7
तो साक्षीकरता, म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा.
8
तो स्वतः प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला होता.
9
जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता.
10
तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही.
11
तो स्वकीयांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.
12
मात्र ज्यांनी त्याचा स्वीकार केला व त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
13
त्यांचा जन्म रक्त, किंवा देहवासना, किंवा मनुष्याची इच्छा, ह्यांच्यामुळे झाला नाही, तर देवाकडून झाला.
14
शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.
15
त्याच्याविषयी योहानने साक्ष दिली आणि आवेशाने म्हटले, “‘जो माझ्या मागून येत आहे, तो माझ्या पुढचा आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी सांगितले, तो हा आहे.”
16
त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.
17
नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली.
18
देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पित्याच्या उराशी असतो त्याने पित्याला प्रकट केले आहे.
19
यहुद्यांनी यरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना पाठवून योहानला विचारले, “आपण कोण आहात?” तेव्हा योहानने दिलेली ही साक्ष आहेः
20
त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, तर स्पष्ट म्हटले, “मी ख्रिस्त नाही.”
21
त्यांनी त्याला विचारले, “मग कोण? आपण एलिया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आम्ही ज्याची वाट पहात आहोत तो संदेष्टा आपण आहात काय?” त्यावर त्याने उत्तर दिले, “नाही.”
22
तेव्हा ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे आम्हांला सांगा. आपले स्वतःविषयी काय म्हणणे आहे?”
23
त्याने उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे “परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.”
24
ही माणसे परुशी लोकांनी पाठवली होती.
25
त्यांनी त्यानंतर योहानला विचारले, “आपण ख्रिस्त नाहीत, एलिया नाहीत व संदेष्टाही नाहीत, तर मग आपण बाप्तिस्मा का देता?”
26
योहानने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा देतो. परंतु ज्याला तुम्ही ओळखत नाही, असा एक तुमच्यात उभा आहे.
27
तो माझ्यानंतर येत आहे, त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.”
28
यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे योहान बाप्तिस्मा देत होता. तेथे ह्या गोष्टी घडल्या.
29
दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू!
30
“जो माझ्यानंतर येत आहे, तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हा आहे.
31
मी त्याला ओळखत नव्हतो, तरी इस्राएली लोकांना त्याची ओळख व्हावी म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा देत आलो आहे.”
32
योहानने अशी साक्ष दिली, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.
33
मी तर त्याला ओळखत नव्हतो परंतु ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा द्यायला पाठवले, त्याने मला सांगितले, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना तू पाहशील, तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणारा आहे.’
34
मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
35
दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा होता
36
आणि येशूला बाजूने चालत जाताना पाहून तो म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू!”
37
त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागे गेले.
38
येशूने वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हटले, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी (म्हणजे गुरुवर्य), आपण कोठे राहता?”
39
तो त्यांना म्हणाला, “या आणि पाहा.” ती दुपारची वेळ होती. त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या बरोबर राहिले.
40
योहानचे म्हणणे ऐकून येशूच्या मागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.
41
त्याने त्याचा भाऊ शिमोन ह्याची लगेच भेट घेतली आणि त्याला सांगितले, “आम्हांला मसिहा (म्हणजे ख्रिस्त) भेटला आहे.”
42
नंतर अंद्रियाने शिमोनला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहत म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस, परंतु तुला केफा म्हणजेच पेत्र म्हणतील.”
43
दुसऱ्या दिवशी येशूने गालीलमध्ये जायचे ठरवले तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”
44
फिलिप हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथील होता.
45
फिलिपला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात व संदेष्ट्यांनीसुद्धा लिहिले आहे, तो म्हणजे योसेफचा मुलगा, नासरेथकर येशू आम्हांला भेटला आहे.”
46
नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी चांगले निघू शकते काय?” फिलिप त्याला म्हणाला, “ये आणि पाहा.”
47
नथनेलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, ह्याच्या मनात कपट नाही!”
48
नथनेलने येशूला विचारले, “आपण मला कसे काय ओळखता?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले.”
49
नथनेल त्याला म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलचे राजे आहात.”
50
येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले, असे सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्यापेक्षा महान गोष्टी तू पाहशील.”
51
आणखी येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, स्वर्ग उघडलेला आणि देवदूतांना वर चढताना व मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.”
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21