bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
John 5
John 5
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 6 →
1
ह्यानंतर यहुदी लोकांचा सण होता, तेव्हा येशू यरुशलेमला गेला.
2
यरुशलेममध्ये मेंढरे नावाच्या फाटकाजवळ एक तलाव आहे. त्याला हिब्रू भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्याला लागून पाच पडव्या आहेत.
3
[त्यांमध्ये रोगी, आंधळे, पांगळे आणि लुळे ह्यांचा मोठा समुदाय असे. ते पाणी ढवळण्याची वाट पाहत असत;
4
कारण देवदूत वेळोवेळी तलावात उतरून पाणी ढवळत असे आणि पाणी ढवळल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला, तरी तो बरा होत असे.]
5
तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक माणूस होता.
6
येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे, हे ओळखून त्याला म्हटले, “तुझी बरे होण्याची इच्छा आहे काय?”
7
त्या रुग्णाने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी ढवळते तेव्हा मला तलावात सोडायला माझा कोणी माणूस नसतो. मी जातो न जातो तोच दुसरा कोणी तरी माझ्या आधी उतरतो.”
8
येशू त्याला म्हणाला, “ऊठ, तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.”
9
लगेच तो माणूस बरा झाला व त्याचे अंथरुण उचलून चालू लागला. हे घडले तो दिवस साबाथ होता.
10
ह्यावरून यहुदी लोक त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज साबाथ असल्यामुळे अंथरुण उचलणे तुझ्यासाठी कायद्याच्या विरुद्ध आहे.”
11
त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले, ‘तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.’”
12
त्यांनी त्याला विचारले, “‘तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग’, असे ज्याने तुला सांगितले, तो माणूस कोण आहे?”
13
तो कोण आहे, हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते कारण त्या ठिकाणी गर्दी होती व येशू तेथून निघून गेला होता.
14
त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. आतापासून तू पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”
15
त्या माणसाने जाऊन यहुदी लोकांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”
16
त्यामुळे ते येशूचा पाठलाग करू लागले, कारण त्याने साबाथ दिवशी हे काम केले होते.
17
परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता अजून काम करत आहे आणि मीही काम करत आहे.”
18
ह्यामुळे त्याला ठार मारावे म्हणून यहुदी लोक अधिकच प्रयत्न करू लागले; कारण तो साबाथ मोडत असे. इतकेच नव्हे, तर देवाला आपला पिता संबोधून स्वतःला देवासमान मानत असे.
19
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, त्याच्यावाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही; कारण जे काही पिता करतो, ते पुत्रही तसेच करतो;
20
कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तो ह्यापेक्षा मोठ्या गोष्टी त्याला दाखवील व तुम्ही थक्क व्हाल.
21
जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो, तसा पुत्रही स्वतःच्या इच्छेनुसार मेलेल्यांना जिवंत करतो.
22
पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचा सर्व अधिकार त्याने पुत्राकडे सोपवला आहे.
23
ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने त्याला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.
24
मी तुम्हांला खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय केला जाणार नाही, त्याने मरणातून जीवनात प्रवेश केला आहे.
25
मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.
26
ज्याप्रमाणे पित्याच्या ठायी जीवन आहे, त्याचप्रमाणे पित्याने त्याच्या पुत्राच्या ठायीदेखील जीवन दिले आहे.
27
त्याला न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. कारण तो मनुष्याचा पुत्र आहे.
28
आश्चर्य मानू नका कारण अशी वेळ येत आहे की, थडग्यांतील सर्व मृत लोक पुत्राची वाणी ऐकतील
29
आणि ते उठतील - ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी.
30
मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो, तसा मी न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले, त्याच्या इच्छेप्रमाणे करतो.
31
मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी नाही.
32
माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे. जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे, हे मला ठाऊक आहे.
33
तुम्ही योहानकडे माणसे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे.
34
मात्र मी मानवी साक्ष स्वीकारत नाही. तरी पण तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो.
35
योहान तेवत राहणारा व प्रकाश देणारा दीप होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करायला तयार झालात.
36
परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे, ती योहानच्या साक्षीपेक्षा अधिक प्रभावी आहे. जी कार्ये पूर्ण करायचे पित्याने माझ्यावर सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
37
शिवाय ज्या पित्याने मला पाठवले, त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे दृश्य रूप पाहिले नाही.
38
तसेच त्याचे वचन तुम्ही आपल्यामध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले, त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवत नाही.
39
तुम्ही धर्मशास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हांला शाश्वत जीवन प्राप्त होईल, असे तुम्हांला वाटते. ते माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
40
तरी पण शाश्वत जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुमची इच्छा नाही.
41
मी माणसांकडून प्रशंसा करून घेत नाही.
42
परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्यात परमेश्वराची प्रीती नाही.
43
मी माझ्या पित्याच्या अधिकाराने आलो आहे, पण माझा स्वीकार तुम्ही करत नाही, दुसरा कोणी स्वतःच्या अधिकाराने आला, तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल.
44
जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हांला श्रद्धा ठेवता येणे कसे शक्य आहे?
45
मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन, असे समजू नका. ज्याची तुम्ही आशा बाळगता, तो मोशे तुम्हांला दोष लावील.
46
तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता, तर माझ्यावर विश्वास ठेवला असता कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.
47
परंतु जर तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या वचनांवर कसा काय विश्वास ठेवाल?”
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21