bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
John 15
John 15
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 16 →
1
“मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे.
2
तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याने अधिक फळ द्यावे म्हणून त्याची छाटणी करतो.
3
मी तुम्हांला जे वचन सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.
4
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्याशिवाय त्याला स्वतः फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांलाही फळ देता येणार नाही.
5
मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हांला काही करता येणार नाही.
6
कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर वेलीपासून छाटलेल्या फाट्याप्रमाणे तो वाळून जातो; असे वाळलेले फाटे एकत्र करून अग्नीत टाकले जातात व तेथे ते जळून जातात.
7
तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिलीत, तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा; ते तुमच्यासाठी केले जाईल.
8
तुम्ही विपुल फळ दिले तर माझ्या पित्याचा गौरव होईल. अशा प्रकारे तुम्ही माझे शिष्य व्हाल.
9
जसा पिता माझ्यावर प्रीती करतो, तसा मीही तुमच्यावर प्रीती करतो. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.
10
जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.
11
माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला हे सारे सांगितले आहे.
12
माझी ही आज्ञा आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा.
13
आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठी प्रीती नाही.
14
तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे मित्र आहात.
15
मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी माझ्या पित्याकडून ऐक ले, ते सर्व मी तुम्हांला सांगितले आहे.
16
तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हांला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, म्हणजे तुम्ही जावे. विपुल फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल, ते त्याने तुम्हांला द्यावे.
17
तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी तुम्हांला आज्ञा आहे.
18
जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केला, हे लक्षात ठेवा.
19
तुम्ही जगाचे असता, तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते. परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते.
20
दास धन्यापेक्षा थोर नाही, हे जे मी तुम्हांला सांगितले, त्या वचनाची आठवण ठेवा. जर त्यांनी माझा छळ केला तर ते तुमचाही करतील. जर त्यांनी माझे वचन पाळले, तर ते तुमचेही पाळतील,
21
परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.
22
मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो, तर त्यांच्याकडे पाप नसते. परंतु आता त्यांना त्यांच्या पापाबद्दलची सबब देता येणार नाही.
23
जो माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.
24
जी कृत्ये दुसऱ्या कोणी केली नाहीत, ती मी त्यांच्यामध्ये केली नसती, तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी माझी कृत्ये पाहिली आहेत तरी ते माझा व माझ्या पित्याचाही द्वेष करतात.
25
‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’, हे जे वचन त्यांच्या धर्मशास्त्रात लिहिले आहे, ते पूर्ण व्हावे म्हणून हे होत आहे.
26
कैवारी, म्हणजे पित्याकडून निघणारा सत्याचा आत्मा, मी पित्याकडून तुमच्याकडे पाठवीन. तो येईल तेव्हा माझ्याविषयी साक्ष देईल
27
आणि तुम्हीही माझ्याविषयी साक्ष द्याल, कारण तुम्ही अगदी प्रारंभापासून माझ्याबरोबर आहात.”
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 16 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21