bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
John 7
John 7
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 8 →
1
त्यानंतर येशू गालीलमध्ये फिरू लागला, यहुदी त्याला ठार मारायला पाहत होते म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही.
2
यहुदी लोकांचा मंडपांचा सण जवळ आला होता,
3
तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “तू जे कार्य करतोस, ते तुझ्या शिष्यांनीही पाहावे म्हणून तू येथून निघून यहुदियात जा.
4
जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो, तो गुप्तपणे काही करत नाही. तू हे कार्य करत आहेस, हे जगाला दाखव.”
5
त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.
6
येशू त्यांना म्हणाला, “माझी उचित वेळ अजून आली नाही, तुमची वेळ तर नेहमीच उचित असते.
7
जग तुमचा द्वेष करू शकत नाही, पण ते माझा द्वेष करते कारण त्याची कृत्ये वाईट आहेत, अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.
8
तुम्ही सणाला जा, मी ह्या सणाला जाणार नाही. कारण माझी उचित वेळ अजून आली नाही.”
9
असे त्यांना सांगून तो गालीलमध्ये राहिला.
10
परंतु त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही तेथे गेला, मात्र उघडपणे नव्हे तर गुप्तपणे गेला.
11
यहुदी त्या सणात त्याचा शोध घेत होते व म्हणत होते, “तो कुठे आहे?”
12
लोकसमुदायात त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहे”, इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहे.”
13
परंतु यहुद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नव्हते.
14
सणाचे सुमारे अर्धे दिवस संपल्यावर येशू मंदिरात जाऊन शिकवण देऊ लागला.
15
ह्यावरून यहुदी लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, “शिक्षण झाले नसताना ह्याला एवढे ज्ञान कसे मिळाले?”
16
त्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे.
17
जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करायची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवाकडून आहे किंवा मी माझ्या स्वतःचे बोलतो, हे समजेल.
18
जो आपल्या स्वतःचे बोलतो तो स्वतःचा गौरव करू पाहतो. परंतु आपल्याला ज्याने पाठवले त्याचा गौरव जो करू पाहतो, तो प्रामाणिक आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
19
मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?”
20
लोकसमुदायाने उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”
21
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्यचकित झाला आहात.
22
मोशेने तुम्हांला सुंता करण्याचा आदेश दिला (जरी ती मोशेपासून नव्हे, तर पूर्वजांपासून सुरू झाली) व तुम्ही साबाथ दिवशी माणसाची सुंता करता.
23
मोशेचा नियम मोडला जाऊ नये ह्याकरता मनुष्याची सुंता जर साबाथ दिवशीदेखील केली जाते, तर मी साबाथ दिवशी एका मनुष्याला पूर्णपणे बरे केले म्हणून तुम्ही माझ्यावर रागावता काय?
24
बाह्यरूप पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”
25
हे ऐकून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, “ज्याला ते ठार मारायला पाहतात तो हाच ना?
26
पाहा, तो उघडपणे बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय?
27
हा कुठला आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला असेल हे कोणालाही माहीत असणार नाही.”
28
नंतर मंदिरात शिकवण देत असता येशूने आवर्जून म्हटले, “तुम्ही मला ओळखता व मी कुठला आहे, हेही तुम्हांला ठाऊक आहे. तथापि मी आपण होऊन आलो नाही, पण ज्याने मला पाठवले तो सत्यस्वरूपी आहे आणि त्याला तुम्ही ओळखत नाही.
29
मी मात्र त्याला ओळखतो कारण मी त्याच्याकडून आलो आहे व त्याने मला पाठवले आहे.”
30
ह्यामुळे ते त्याला धरायला पाहत होते, तरी पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती.
31
मात्र लोकसमुदायातील बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणाले, “ख्रिस्त येईल तेव्हा ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो अधिक चिन्हे करील काय?”
32
लोकसमुदाय येशूविषयी अशी कुजबुज करीत आहे, हे परुश्यांच्या कानावर गेले म्हणून त्यांनी व मुख्य याजकांनी त्याला अटक करण्याकरता काही अधिकारी पाठवले.
33
मग येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर असेन व नंतर ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाईन.
34
तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
35
ह्यामुळे यहुदी आपसात म्हणाले, “हा असा कुठे जाणार आहे की, तो आपल्याला सापडणार नाही? ज्या ग्रीक शहरांत आपल्या लोकांची पांगापांग झालेली आहे, तेथे जाऊन हा ग्रीक लोकांना शिकवणार की काय?
36
‘तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’, ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?”
37
सणाच्या शेवटच्या महान दिवशी, येशूने उभे राहून जाहीर आवाहन केले, “ज्याला तहान लागली आहे, त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
38
जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या अंतःकरणातून, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जीवनदायक पाण्याच्या नद्या वाहतील.”
39
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना जो पवित्र आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. पवित्र आत्मा त्या वेळेपर्यंत दिलेला नव्हता कारण तोपर्यंत येशूचा गौरव झालेला नव्हता.
40
लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणाले, “खरोखर हाच तो संदेष्टा आहे.”
41
इतर म्हणत होते, “हा ख्रिस्त आहे”, परंतु आणखी काही म्हणाले, “ख्रिस्त गालीलमधून येणार आहे का?
42
दावीदच्या वंशाचा व ज्या बेथलहेममध्ये दावीद राहत होता. त्या नगरातून ख्रिस्त येणार, असे धर्मशास्त्रात सांगितले नाही काय?”
43
ह्यामुळे त्याच्यावरून लोकसमुदायात फूट पडली.
44
त्यांच्यातील काही लोक त्याला अटक करू पाहत होते तरी पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही.
45
मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडे अधिकारी परत आले. त्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही त्याला का आणले नाही?”
46
अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”
47
त्यावरून परुशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसलात का?
48
अधिकाऱ्यांपैकी किंवा परुश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का?
49
परंतु हा लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही म्हणून तो शापग्रस्त आहे.”
50
येशूकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला,
51
“एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व त्याने काय केले आहे, ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”
52
त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलमधले आहात काय? धर्मशास्त्राचा अभ्यास करून पाहा म्हणजे गालीलमधून कोणी संदेष्टा उदयास येणार नाही, हे तुम्हांला कळेल.”
53
[त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21