bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
John 8
John 8
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 9 →
1
येशू ऑलिव्ह डोंगरावर गेला.
2
भल्या पहाटेस तो पुन्हा मंदिरात गेला. तेव्हा लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.
3
व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुशी ह्यांनी त्या वेळी त्याच्याकडे आणले. तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले,
4
“गुरुजी, ही स्त्री प्रत्यक्ष व्यभिचार करत असताना धरण्यात आली.
5
मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?”
6
त्याला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. परंतु येशू ओणवा होऊन बोटाने जमिनीवर लिहू लागला.
7
ते त्याला एकसारखे प्रश्न विचारत असता, तो उभा राहून त्यांना म्हणाला, “तुमच्यांत जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.”
8
तो पुन्हा ओणवा होऊन जमिनीवर लिहू लागला.
9
हे ऐकून वयोवृद्ध माणसांपासून सुरुवात करून शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एक एक असे निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री तेथेच मध्ये उभी होती.
10
येशू पुन्हा उभा राहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरवले नाही काय?”
11
ती म्हणाली, “प्रभो, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दोषी ठरवत नाही, जा, ह्यापुढे पाप करू नकोस.”]
12
येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
13
परुशी त्याला म्हणाले, “तुम्ही आता स्वतःविषयी साक्ष देत आहात, त्यामुळे तुमची साक्ष खरी नाही.”
14
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष देत असलो तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो व कुठे जातो, हे मला ठाऊक आहे. मी कुठून आलो व कुठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही.
15
तुम्ही मानवी मापदंड वापरून न्याय करता. मी कोणाचा न्याय करत नाही.
16
परंतु जर मी कोणाचा न्याय केला, तर माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही तर ज्याने मला पाठवले, तो पिता माझ्याबरोबर आहे.
17
तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी असते.
18
मी स्वतःविषयी साक्ष देतो आणि ज्या पित्याने मला पाठवले, तोही माझ्याविषयी साक्ष देतो.”
19
ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “तुमचा पिता कुठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्याला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
20
मंदिरात शिकवत असताना दानपेट्या ठेवण्याच्या खोलीत तो ही वचने बोलला. परंतु त्याला कोणी अटक केली नाही कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.
21
येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जाईन आणि तुम्ही मला शोधाल परंतु तुम्ही तुमच्या पापांत मराल. मी जेथे जातो, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
22
तेव्हा यहुदी अधिकारी म्हणाले, “‘मी जेथे जातो, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’, असे हा म्हणतो, ह्याअर्थी हा आत्महत्या तर करणार नाहीना?”
23
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात परंतु मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहात परंतु मी ह्या जगाचा नाही.
24
ह्यामुळे मी तुम्हांला सांगितले, तुम्ही तुमच्या पापांत मराल कारण मी जो आहे, तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही तुमच्या पापांत मराल.”
25
त्यांनी त्याला विचारले, “तुम्ही कोण आहात?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे.
26
मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे. ज्याने मला पाठवले तो सत्य आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्याच मी जगापुढे जाहीर करतो.”
27
तो आपल्याशी पित्याविषयी बोलत आहे, हे त्यांना समजले नाही.
28
म्हणून येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, तेव्हा तुम्हांला कळेल की, मी तो आहे. मी स्वतःच्या अधिकाराने काही करत नाही. तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.
29
ज्याने मला पाठवले, तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही; कारण जे त्याला आवडते, ते मी नेहमी करतो.”
30
ह्या गोष्टी बोलत असताना पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
31
नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात.
32
तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.”
33
त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्ही अब्राहामचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या गुलामगिरीत नव्हतो, तर ‘तुम्ही बंधमुक्त व्हाल’, असे कसे म्हणता?”
34
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी पाप करतो, तो पापाचा गुलाम असतो.
35
गुलाम घरात सदासर्वदा राहत नाही परंतु पुत्र सदासर्वदा राहतो.
36
म्हणून जर पुत्राने तुम्हांला बंधमुक्त केले, तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.
37
तुम्ही अब्राहामचे वंशज आहात, हे मला ठाऊक आहे. तरीही तुमच्यात माझ्या वचनाला स्थान नाही म्हणून तुम्ही मला ठार मारायला पाहता.
38
माझ्या पित्याजवळ मी जे पाहिले आहे, त्याविषयी मी बोलतो, परंतु तुमच्या पित्याजवळ तुम्ही जे पाहिले आहे, त्याप्रमाणे तुम्ही करता.”
39
त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खरोखर अब्राहामची मुले असता, तर तुम्ही अब्राहामने केली तशी कृत्ये केली असती.
40
मी देवाकडून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले तरीही मला तुम्ही आता ठार मारायला पाहता, अब्राहामने असे केले नाही!
41
तुम्ही तुमच्या बापाची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर स्वतः आमचा पिता आहे. आम्ही त्याची खरी मुले आहोत.”
42
येशूने त्यांना म्हटले, “परमेश्वर जर तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवाकडून आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्याने मला पाठवले आहे.
43
तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुम्हांला माझे वचन ऐकवत नाही.
44
तुम्ही तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून जन्मला आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यापुढे टिकला नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलतो; कारण तो लबाड असून सर्व असत्याचा बाप आहे.
45
पण मी तुम्हांला खरे ते सांगतो तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.
46
तुमच्यापैकी कोण मला पापांबद्दल दोषी ठरवू शकतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही?
47
जो देवाकडचा आहे तो देवाची वचने ऐकतो, परंतु तुम्ही देवाकडचे नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही?”
48
यहुदी लोकांनी येशूला विचारले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हांला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो, ते बरोबर आहे की नाही?”
49
येशूने उत्तर दिले, “मला भूत लागले नाही, तर मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही मात्र माझा अपमान करता.
50
मी स्वतःचा गौरव करू पाहत नाही. माझा गौरव करू पाहणारा व माझ्या बाजूने न्यायनिवाडा करणारा असा तो आहे.
51
मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो, जो माझे वचन पाळील तो कधीही मरण पाहणार नाही.”
52
ते त्याला म्हणाले, “आता आम्हांला कळले की, तुम्हांला भूत लागले आहे. अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरीही तुम्ही म्हणता, ‘जर कोणी माझे वचन पाळील, तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.’
53
आमचा पिता अब्राहाम निधन पावला. त्याच्यापेक्षा तुम्ही थोर आहात काय? संदेष्टेही मरण पावले, तुम्ही स्वतःला कोण समजता?”
54
येशूने उत्तर दिले, “मी माझा स्वतःचा गौरव केला, तर त्याला काही अर्थ नाही. माझा गौरव करणारा माझा पिता आहे व त्याच्याविषयी ‘तो आमचा देव आहे’, असे तुम्ही म्हणता.
55
तरीही तुम्ही त्याला ओळखले नाही पण मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखत नाही, असे जर मी म्हणालो तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. परंतु मी त्याला खरोखर ओळखतो व त्याचे वचन पाळतो.
56
तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हसित झाला होता. त्याने तो पाहिला व त्याला हर्ष झाला.”
57
तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, “तुम्ही अजून पन्नास वर्षांचे झाला नाही आणि तुम्ही अब्राहामला पाहिले आहे काय?”
58
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, अब्राहाम होता त्यापूर्वी मी आहे.”
59
ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले, परंतु येशू लपून राहिला व नंतर मंदिरातून निघून गेला.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21