bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ezekiel 21
Ezekiel 21
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 22 →
1
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2
“मानवपुत्रा, यरुशलेमेकडे आपले तोंड कर, पवित्रस्थानाकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे व इस्राएल देशाविरुद्ध संदेश दे;
3
इस्राएल देशास सांग, परमेश्वर असे म्हणतो की पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, मी आपली तलवार म्यानातून उपसून तुझ्यातले नीतिमान व दुष्कर्मी ह्यांना छेदून टाकीन.
4
मी तुझ्यातले नीतिमान व दुष्कर्मी ह्यांना छेदून टाकणार, ह्यास्तव माझी तलवार म्यानातून निघून दक्षिणोत्तर सर्व मानवजातीवर चालेल;
5
तेव्हा सर्व मानवजातीला समजेल की मी परमेश्वराने आपली तलवार म्यानातून उपसली आहे; ती पुन्हा त्यात परत जाणार नाही.
6
ह्यास्तव हे मानवपुत्रा, कंबर मोडेल असा उसासा टाक, त्यांच्यासमक्ष कष्टाने उसासा टाक
7
आणि ‘उसासा का टाकतोस?’ असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांना सांग की, ‘ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तिच्याप्रमाणे खास घडेल,”’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
8
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
9
“मानवपुत्रा, संदेश देऊन सांग; परमेश्वर असे म्हणतो, तलवार, पाणी दिलेली, पाजवलेली तलवार!
10
वध करावा म्हणून तिला पाणी दिले आहे, ती विजेप्रमाणे चमकावी म्हणून ती पाजवली आहे! माझ्या पुत्राचे राजवेत्र सर्व राजदंडांना तुच्छ लेखते, असे म्हणून आपण आनंद करावा काय?
11
ती हाती धरावी म्हणून पाजवण्यास दिली आहे; तलवार वध करणार्याच्या हाती द्यावी म्हणून तिला पाणी दिले आहे, ती पाजवली आहे.
12
मानवपुत्रा, ओरड, आक्रंदन कर; कारण ती माझ्या लोकांवर चालली आहे, ती इस्राएलांच्या सर्व सरदारांवर चालली आहे; माझ्या लोकांबरोबर तेही तलवारीने पडले आहेत, म्हणून आपले ऊर बडव.1
13
कारण त्याला कसोटीस लावले आहे; आणि तुच्छ मानणारे राजवेत्र टिकले नाही तर कसे?” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
14
“मानवपुत्रा, तू संदेश देऊन टाळी वाजव म्हणजे तलवारीस, भोसकणार्या तलवारीस, तिप्पट जोर येईल; त्यांना घेरणारी तलवार थोरांनाही भोसकणारी होईल.
15
त्यांचे हृदय गलित व्हावे, व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावेत म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तलवार चालवली आहे; अहो! ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे.
16
अगे तलवारी, तुझे मुख जसे फिरेल तशी तू सावरून उजवीकडे वळ, डावीकडे फीर.
17
मीही टाळी वाजवून आपल्या क्रोधाची पूर्तता करीन; मी परमेश्वर हे म्हणतो.”
18
परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की,
19
“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाची तलवार येण्याकरता दोन रस्ते आखून काढ; ते दोन्ही रस्ते एकाच देशातून निघावेत; नगरात जाणार्या रस्त्याच्या चवाठ्यावर मार्गदर्शक हाताची एक आकृती खोदून काढ.
20
अम्मोनपुत्रांचा राब्बा ह्याच्यावर तलवार येण्याचा एक रस्ता आणि यहूदात जाऊन तटबंदी केलेल्या यरुशलेमेवर तलवार येण्याचा एक रस्ता आखून काढ.
21
कारण बाबेलचा राजा चवाठ्यावर, दोन रस्ते फुटतात तेथे शकुन पाहण्यासाठी थांबला आहे; तो भात्यांतले बाण हलवून प्रश्न पाहत आहे, तेराफीमांना1 कौल लावत आहे, यज्ञपशूच्या काळजावरून शकुन पाहत आहे.
22
त्याच्या उजव्या बाजूस यरुशलेमेविषयी शकुन निघाला; तो असा की आघातयंत्रे लावावीत, ‘मारा! हाणा!’ असे शब्द तोंडातून काढावेत; सिंहनाद करावा, वेशींना आघातयंत्रे लावावीत; मोर्चे रचावेत व बुरूज बांधावेत.
23
इस्राएलाच्या दृष्टीने हा शकुन खोटा आहे, कारण त्यांच्याजवळ देवाचे प्रतिज्ञापूर्वक करार आहेत; तरी तो त्यांना त्यांच्या अधर्माचे स्मरण देऊन परक्यांच्या स्वाधीन करतो.
24
ह्यासाठी प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमचे अपराध उघडकीस येऊन तुमच्या सर्व कृत्यांत तुमची पातके दिसून येतात; येणेकरून तुम्हीच आपल्या स्वत:ला अधर्माचे स्मरण देता, तुमचे स्मरण झाले आहे म्हणून तुम्ही परक्यांच्या हाती सापडला आहात.
25
हे जखमी झालेल्या पातक्या, इस्राएलाच्या सरदारा, तुझी घटका, तुझा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे;
26
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, शिरोभूषण उतरव. मुकुट काढून टाक; काहीच कायम राहणार नाही; जे नीच ते उंच होईल आणि जे उंच ते नीच होईल.
27
मी त्याचा विध्वंस करीन, करीनच करीन; ही स्थिती अशीच राहायची नाही; ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्याला मी सत्ता देईन.
28
हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोनपुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग; तलवार, वधासाठी तलवार उपसली आहे, फन्ना उडवण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजवली आहे.
29
ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.
30
ती पुन्हा म्यानात घाल. जेथे तू निर्माण झालास त्या तुझ्या जन्मभूमीवर मी तुझा न्याय करीन.
31
मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझ्यावर करीन, माझ्या कोपाग्नीचा मी तुझ्यावर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन.
32
तू अग्नीला भक्ष्य होशील; तुझे रक्त देशात पडून राहील; तुझी पुढे आठवण राहणार नाही, कारण मी परमेश्वर हे बोललो आहे.”
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 22 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48