bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ezekiel 34
Ezekiel 34
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 33
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 35 →
1
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2
“मानवपुत्रा, इस्राएलाच्या मेंढपाळांविरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो: जे इस्राएलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांना धिक्कार असो! मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही?
3
तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता; त्यांतली लठ्ठलठ्ठ पाहून कापता, परंतु कळपाला चारत नाही.
4
तुम्ही निर्बलांना बलवान करत नाही, रोग्यांना बरे करत नाही, घायाळांचे घाय बांधत नाही, घालवून दिलेल्यांना परत आणत नाही, हरवलेल्यांना शोधत नाही; तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व कडकपणे सत्ता चालवता.
5
त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली; ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली.
6
माझी मेंढरे सर्व डोंगरांवरून, सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत; देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत; त्यांची कोणाला शुद्ध नाही, कोणी त्यांना शोधत नाही.
7
ह्यास्तव मेंढपाळहो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका:
8
प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; माझी मेंढरे सर्व वनपशूंना भक्ष्य झाली आहेत; माझ्या मेंढपाळांना मेंढरांची शुद्ध नाही. मेंढपाळ आपणच चरतात, पण मेंढरांना चारत नाहीत.
9
ह्यास्तव मेंढपाळहो, परमेश्वराचे वचन ऐका:
10
प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन; माझा कळप चारण्याची त्यांना मी बंदी करीन; त्यांना स्वतः चरायला मिळणार नाही; मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन म्हणजे ह्यापुढे ती त्यांना भक्षण करण्यास सापडणार नाहीत.
11
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन; त्यांना मी हुडकीन.
12
जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन.
13
मी त्यांना राष्ट्रांतून आणीन, निरनिराळ्या देशांतून त्यांना जमा करीन; मी त्यांना स्वदेशी परत आणीन; मी इस्राएलाच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ व देशातल्या सर्व वसतिस्थानांत त्यांना चारीन.
14
मी त्यांना चांगल्या चरणीत चारीन, त्यांची चरण इस्राएलाच्या उंच पहाडांवर होईल; ते तेथे चांगल्या चरणीत बसतील, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांना उत्तम चारा मिळेल.
15
मी स्वत: माझा कळप चारीन व त्यांची निजण्याबसण्याची सोय करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
16
मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन; पण लठ्ठ व बलिष्ठ ह्यांचा मी नाश करीन; त्यांना मी यथान्याय चारीन.
17
प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा, तुमचे असे होईल; मी मेंढरामेंढरांमध्ये, एडक्याबोकडांमध्ये निवाडा करीन.
18
तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायांनी तुडवता; तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता, हे काहीच नाही असे तुम्हांला वाटते काय?
19
माझी मेंढरे तुमच्या पायांनी तुडवलेला चारा खातात व तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात.
20
ह्यास्तव प्रभू परमेश्वर त्यांना म्हणतो, पाहा, मी, मीच पुष्ट पशू व रोड पशू ह्यांमध्ये निवाडा करीन.
21
अशक्त झालेल्यांना तुम्ही आपल्या अंगाने व खांद्याने धक्के देता व आपल्या शिंगांनी हुंदडून हाकून देता;
22
म्हणून मी आपल्या कळपाचा बचाव करीन, म्हणजे ते इत:पर दुसर्यांचे भक्ष्य होणार नाहीत; मी मेंढरामेंढरांमध्ये निवाडा करीन.
23
त्यांच्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यांना चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांना चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल.
24
मी परमेश्वर त्यांचा देव होईन, व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल; मी परमेश्वर हे बोललो आहे.
25
मी क्षेमवचन देऊन त्यांच्याबरोबर करार करीन, देशातून दुष्ट पशू नाहीतसे करीन म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील.
26
मी त्यांना व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळांना मंगलदायक करीन; पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन; मंगलदायक वृष्टी होईल.
27
मळ्यातील झाडे फलद्रूप होतील, भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील; मी त्यांच्यावरील जोखडांची बंधने तोडून ज्यांनी त्यांच्याकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातून त्यांना सोडवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
28
ते ह्यापुढे परराष्ट्रांना भक्ष्य होणार नाहीत; वनपशू त्यांना फाडून खाणार नाहीत; तर ते निर्भय वसतील, कोणी त्यांना भीती घालणार नाही.
29
मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, म्हणजे पुनरपि त्यांच्या देशावर दुष्काळ येऊन त्यांचा र्हास होणार नाही; त्यांना पुन्हा परराष्ट्रीय लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही.
30
तेव्हा मी परमेश्वर त्यांचा देव त्यांच्याबरोबर आहे व इस्राएल घराणे माझी प्रजा आहे हे त्यांना समजेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
31
तुम्ही माझी मेंढरे, माझ्या चरणीतला कळप आहात; तुम्ही मानव आणि मी तुमचा देव आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
← Chapter 33
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 35 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48