bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ezekiel 40
Ezekiel 40
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 39
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 41 →
1
आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे नगराचा विध्वंस झाल्यावर चौदाव्या वर्षी, वर्षारंभाच्या महिन्याच्या दशमीसच परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व त्याने मला तेथे नेले.
2
त्याने दिव्य दृष्टान्ताच्या द्वारे मला इस्राएल देशात नेऊन एका अतिशय उंच पर्वतावर ठेवले; त्यावर दक्षिणेस नगराच्या आकारासारखे काही होते.
3
त्याने मला त्या जागी नेले तेव्हा एक पुरुष दिसला; त्याचे स्वरूप पितळेसारखे होते; त्याच्या हातात तागाची एक दोरी व मापण्याची काठी होती; तो वेशीनजीक उभा होता.
4
तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.”
5
मी पाहिले तर त्या मंदिराभोवती एक तट होता; त्या पुरुषाच्या हातात मापण्याची एक काठी होती; ती सहा हात लांबीची होती; हे माप एक हात व चार अंगुळे होते. त्याने त्या इमारतीच्या भिंतीची जाडी एक काठी व उंची एक काठी मापली.
6
तो पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे जाऊन पायर्या चढून वर गेला; त्याने द्वाराचा उंबरठा एक काठी रुंद मापला; हा पहिला उंबरठा एक काठी भरला.
7
प्रत्येक चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद असून त्या चौक्यांमधील अंतर पाच हात होते; मंदिरासमोरील देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एक काठी होता.
8
मंदिराकडल्या द्वाराची देवडी त्याने एक काठी मापली.
9
त्याने त्या द्वाराच्या देवडीचे माप घेतले ते आठ हात भरले; तिचे खांब दोन हात भरले; ही द्वाराची देवडी मंदिरासमोर होती.
10
पूर्वेकडील द्वाराच्या ह्या बाजूला व त्या बाजूला तीन-तीन चौक्या होत्या; त्या तिन्हींचे माप सारखेच असून दोन्ही बाजूंचे खांबही एकाच मापाचे होते.
11
त्याने द्वाराच्या प्रवेशमार्गाची रुंदी दहा हात व द्वाराची लांबी तेरा हात मापली;
12
त्या चौक्यांच्या पुढची जागा एका बाजूला एक हात व दुसर्या बाजूला एक हात होती; त्या चौक्या दोन्ही बाजूंना सहा-सहा हात होत्या.
13
त्याने एका चौकीच्या छावणीपासून दुसरीच्या छावणीपर्यंत दाराला दार धरून पंचवीस हात रुंदी मापली.
14
त्याने देवडीचे माप घेतले; ते वीस हात भरले;1 त्या देवडीला2 लागून द्वाराभोवती अंगण होते.
15
प्रवेशद्वारापासून आतील द्वाराच्या देवडीच्या पुढल्या भागापर्यंत पन्नास हात भरले.
16
त्या चौक्यांना व द्वारांच्या आतल्या बाजूंना त्यांच्या खांबांना झरोके होते; भिंतीच्या महिरपींनाही झरोके होते; असे आतल्या चोहोबाजूंना झरोके होते, व खांबांवर खजुरीची झाडे कोरलेली होती.
17
तेव्हा त्याने मला बाहेरील अंगणात नेले तेव्हा तेथे सभोवार खोल्या असून त्या अंगणात चिरेबंदी केली होती असे दृष्टीस पडले; ह्या चिरेबंदीवर तीस खोल्या होत्या.
18
ही चिरेबंदी म्हणजे अर्थात खालची चिरेबंदी द्वारांना लागून त्यांच्या लांबीइतकी होती.
19
तेव्हा त्याने खालच्या द्वारापुढून आतील अगंणापर्यंत रुंदी मोजली; ती पूर्व व उत्तर बाजूंना शंभर हात भरली.
20
मग त्याने बाहेरल्या अंगणाला लागून उत्तराभिमुख असलेल्या द्वाराची लांबीरुंदी मोजली.
21
त्यांच्या चौक्या ह्या बाजूला तीन व त्या बाजूला तीन होत्या; त्याचे खांब व महिरपी ही पहिल्या द्वाराच्या मापाप्रमाणे होती; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
22
त्याचे झरोके, महिरपी व कोरलेली खजुरीची झाडे ही पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराच्या मापाप्रमाणे होती; त्यावर चढून जाण्यासाठी सात पायर्या होत्या, व त्यांच्यासमोर त्याच्या महिरपी होत्या.
23
आतल्या अंगणात पूर्वेकडच्या द्वारासारखे उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते; एका द्वारापासून दुसर्या द्वारापर्यंत त्याने शंभर हात मापले.
24
मग त्याने मला दक्षिणभागी नेले, तेव्हा तेथे दक्षिणाभिमुख एक द्वार दृष्टीस पडले; त्याचे खांब व महिरपी त्याने मापल्या त्या पूर्वीच्या इतक्या भरल्या.
25
वर सांगितलेल्या झरोक्यांप्रमाणे ह्यांनाही सभोवार झरोके व महिरपी होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
26
त्यावर चढून जाण्यास सात पायर्या होत्या व त्यांच्यासमोर त्याच्या महिरपी होत्या; व त्यांच्या खांबांवर अलीकडे-पलीकडे एकेक खजुरीचे झाड कोरले होते.
27
दक्षिणेकडे आतल्या अंगणाला द्वार होते; दक्षिणेकडल्या ह्या द्वारापासून त्या द्वारापर्यंत शंभर हात भरले.
28
तेव्हा त्याने मला दक्षिणद्वाराने आतल्या अंगणात नेऊन दक्षिणद्वार मापले, ते तितकेच भरले;
29
त्याप्रमाणेच त्याने त्याच्या चौक्या, खांब व त्यांच्यावरील महिरपी ही मापली, ती तेवढीच भरली; त्याला व त्याभोवतालच्या महिरपींना झरोके होते; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात भरली.
30
त्याला सभोवार महिरपी होत्या; त्या एकंदर पंचवीस हात लांब व पाच हात रुंद होत्या.
31
त्याच्या महिरपी बाहेरल्या अंगणाच्या बाजूला होत्या; त्याच्या खांबांवर खजुरीची झाडे कोरली होती; त्यावर चढून जाण्यासाठी आठ पायर्या होत्या.
32
मग त्याने मला पूर्वेकडल्या आतील अंगणात नेऊन ते द्वार मापले, ते तेवढेच भरले.
33
त्याच्या चौक्या, खांब व महिरपी त्याने मापल्या, त्याही तेवढ्याच भरल्या; त्याला सभोवार झरोके व महिरपी होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
34
त्याच्या महिरपी बाहेरील अंगणाच्या बाजूला होत्या; त्याच्या खांबांवर अलीकडे-पलीकडे खजुरीची झाडे कोरली होती; त्यावर चढून जाण्यास आठ पायर्या होत्या.
35
मग त्याने मला उत्तरद्वाराकडे नेले; तेही त्याने मापले व ते तितकेच भरले.
36
त्याच्या चौक्या, खांब व महिरपी त्याने मापल्या; त्याला सभोवार झरोके होते; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
37
त्याचे खांब बाहेरील अंगणाच्या बाजूला होते; त्यांच्यावर अलीकडे-पलीकडे खजुरीची झाडे कोरली होती; त्यावर चढून जाण्यास आठ पायर्या होत्या.
38
द्वारांजवळ खांबांना लागून एकेक खोली असून तिला दार होते; तेथे होमबली धूत असत.
39
द्वाराच्या देवडीत होमार्पण, पापार्पण व दोषार्पण ह्यांचे पशू कापण्यासाठी ह्या बाजूला दोन व त्या बाजूला दोन अशी मेजे होती.
40
आणि बाहेरच्या अंगास, उत्तराभिमुख असलेल्या द्वाराच्या प्रवेशमार्गी चढून जाण्याच्या वाटेवर दोन मेजे होती; तसेच दुसर्या अंगास द्वाराच्या देवडीनजीक दोन मेजे होती.
41
द्वाराच्या बाहेरील अंगाला दोन्ही बाजूंना चार-चार मेजे होती; अशी यज्ञपशू कापण्यासाठी आठ मेजे होती.
42
होमार्पणासाठी ताशीव दगडांची चार मेजे होती; ती दीड हात लांब, दीड हात रुंद व एक हात उंच अशी होती; ज्या हत्यारांनी होमबली व इतर यज्ञपशू कापत ती त्यांच्यावर ठेवत असत.
43
चार अंगुले लांबीच्या आकड्या मंदिरात सभोवार लावलेल्या होत्या; यज्ञपशूचे मांस त्या मेजांवर ठेवत असत.
44
आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणात दोन खोल्या होत्या, एक उत्तरद्वाराच्या बाजूस दक्षिणाभिमुख होती व दुसरी दक्षिणद्वाराच्या बाजूस उत्तराभिमुख होती.
45
तो मला म्हणाला, ही दक्षिणाभिमुख असलेली खोली ह्या मंदिराचे रक्षण करणार्या याजकांसाठी आहे.
46
आणि उत्तराभिमुख असलेली खोली वेदीचे रक्षण करणार्या याजकांसाठी आहे; ते सादोकाचे वंशज आहेत; ते लेवीच्या वंशातले असून परमेश्वरासमीप सेवा करण्यासाठी जातात.
47
त्याने अंगण मापले ते शंभर हात लांब व शंभर हात रुंद असे चौरस भरले; आणि मंदिरासमोर वेदी होती.
48
मग त्याने मला मंदिराच्या देवडीत नेले व त्या देवडीचा प्रत्येक खांब मापला तो एका बाजूने पाच हात व दुसर्या बाजूने पाच हात भरला; त्या द्वाराची रुंदी एका बाजूने तीन हात व दुसर्या बाजूने तीन हात भरली.
49
देवडीवर चढून जाण्यास पायर्या होत्या, त्या बाजूने तिची लांबी वीस हात व रुंदी अकरा1 हात भरली; त्या खांबांच्या एका बाजूला एक व दुसर्या बाजूला एक असे लहान खांब होते.
← Chapter 39
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 41 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48