bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ezekiel 46
Ezekiel 46
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 45
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 47 →
1
प्रभू परमेश्वर म्हणतो, आतील अंगणाचे पूर्वाभिमुख असलेले द्वार कामाचे सहा दिवस बंद असावे; शब्बाथ दिवशी ते उघडे ठेवावे; तसेच चंद्रदर्शनाच्या दिवशीही ते उघडे ठेवावे.
2
अधिपतीने बाहेरून दरवाजाच्या देवडीकडे जाणार्या मार्गाने यावे; त्याने दरवाजाच्या बाह्यांनजीक उभे राहावे; याजकांनी त्याच्याकडील होमार्पण व शांत्यर्पणे करावीत; मग त्याने दरवाजाच्या उंबरठ्यावरून परमेश्वराला दंडवत घालून बाहेर जावे; हा दरवाजा संध्याकाळपर्यंत बंद करू नये.
3
देशाच्या लोकांनी शब्बाथ दिवशी व चंद्रदर्शनी त्या दरवाजावरूनच परमेश्वराला दंडवत घालावे.
4
अधिपतीने शब्बाथ दिवशी परमेश्वराला होमार्पण करायचे ते सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष एडका ह्यांचे असावे;
5
दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण करावे व दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे आणि प्रत्येक एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.
6
चंद्रदर्शनाच्या दिवशी एक निर्दोष गोर्हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष एडका ही अर्पण करावीत;
7
दर गोर्ह्यामागे एक एफा व दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे; दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि प्रत्येक एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.
8
अधिपतीने आत प्रवेश करताना दरवाजाच्या देवडीकडील मार्गाने यावे व त्याच मार्गाने बाहेर जावे.
9
सणाच्या दिवशी देशाचे लोक परमेश्वरासमीप येतील तेव्हा त्यांच्यापैकी जो नमन करण्यास उत्तरद्वाराने आत येईल त्याने दक्षिणद्वाराने बाहेर जावे व दक्षिणद्वाराने जो आत येईल त्याने उत्तरद्वाराने बाहेर जावे; ज्या द्वाराने तो येईल त्याच द्वाराने त्याने परत जाऊ नये, तर नीट पुढे जावे.
10
ते प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे; ते बाहेर जातानाही त्याने त्यांच्याबरोबर जावे.
11
उत्सवांच्या व सणांच्या दिवशी दर गोर्ह्यामागे एक एफा अन्नार्पण व दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण करावे; दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि दर एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.
12
अधिपती परमेश्वराला स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली किंवा शांत्यर्पणे करील तेव्हा त्याच्यासाठी पूर्वाभिमुख असलेले द्वार उघडावे, आणि शब्बाथ दिवसाच्याप्रमाणे त्याने होमार्पणे व शांत्यर्पणे करावीत; तो बाहेर निघून गेल्यावर द्वार कोणीतरी बंद करावे.
13
परमेश्वराला रोज होमार्पण करण्यासाठी एक वर्षाचे निर्दोष असे कोकरू सिद्ध करावे; दररोज सकाळी ते सिद्ध करावे.
14
दररोज सकाळी त्याबरोबर अन्नार्पण सिद्ध करावे; गव्हाचे पीठ एक षष्ठांश एफा, व ते नरम करण्यासाठी एक तृतीयांश हिन तेल, असे अन्नार्पण परमेश्वराला करावे; हा सर्वकालचा विधी सतत चालणार आहे.
15
ह्या प्रकारे रोज सकाळी कोकरू, अन्नार्पण व तेल असे नित्यक्रमाने होमार्पण सिद्ध करावे.
16
प्रभू परमेश्वर म्हणतो, अधिपती आपल्या पुत्रांपैकी कोणाला काही इनाम देईल तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या पुत्रांचे होईल; ते त्यांचे वंशपरंपरेने वतन होईल;
17
पण तो आपल्या वतनाचा काही भाग आपल्या एखाद्या चाकरास इनाम देईल तर मुक्ततेच्या वर्षापर्यंत तो त्याच्याकडे राहील; मग तो अधिपतीकडे परत जाईल; त्याचे वतन त्याच्या पुत्रांनाच मिळेल.
18
आणखी अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यांना घालवून देऊ नये; त्याने आपल्या खाजगी वतनाचा भाग आपल्या पुत्रांना द्यावा; म्हणजे माझ्या लोकांपैकी कोणीही वतनास मुकून परागंदा होणार नाही.”
19
मग द्वाराजवळ असलेल्या वाटेने याजकांच्या उत्तराभिमुख पवित्र खोल्यांत त्याने मला नेले; तर तेथे पश्चिमेस अगदी बाहेरल्या बाजूंस एक स्थान आढळले.
20
तो मला म्हणाला, “याजक दोषार्पणाचे व पापार्पणाचे मांस शिजवतात ते हे स्थळ; अन्नार्पणही तेथेच भाजतात; त्यांनी ती बाहेरच्या अंगणात नेऊ नयेत, म्हणजे त्यांच्या स्पर्शाने लोक पवित्र होणार नाहीत.”
21
नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात नेले व त्याच्या चार्ही कोपर्यांतून मला फिरवले तेव्हा त्या अंगणाच्या प्रत्येक कोपर्यात आणखी एकेक अंगण दृष्टीस पडले.
22
अंगणाच्या चार्ही कोपर्यांना चाळीस हात लांबीची व तीस हात रुंदीची आवारे होती; ती एका मापाची होती;
23
त्या चार्हींमध्ये चोहोंकडे चुलाणांच्या रांगा होत्या, आणि ह्या रांगांखाली सभोवार स्वयंपाकाच्या चुली होत्या.
24
तो मला म्हणाला, “ह्या पाकशाला आहेत, ह्यांत मंदिराची सेवाचाकरी करणारे इसम लोकांचे यज्ञपशू शिजवतात.”
← Chapter 45
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 47 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48