bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ezekiel 48
Ezekiel 48
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 47
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
1
आता वंशांची नावे ही: उत्तरेच्या सीमेपासून हेथलोनच्या रस्त्याकडील हमाथाच्या घाटाचा रस्ता, दिमिष्काच्या सरहद्दीवरले हसर-एनान, ह्या पूर्व-पश्चिम सीमा असलेला प्रदेश, हमाथाला लागून असलेला जो उत्तरेकडील प्रदेश तो दानाचा विभाग.
2
दानाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो आशेराचा विभाग.
3
आशेराच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो नफतालीचा विभाग.
4
नफतालीच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो मनश्शेचा विभाग.
5
मनश्शेच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो एफ्राइमाचा विभाग.
6
एफ्राइमाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो रऊबेनाचा विभाग.
7
रऊबेनाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो यहूदाचा विभाग.
8
यहूदाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश पंचवीस हजार हात1 रुंद व इतर वंशांच्या विभागांइतका पूर्वपश्चिम लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल त्यामध्ये पवित्रस्थान असणार.
9
परमेश्वराला जो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल तो पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असावा.
10
हा समर्पित अंश याजकांचा; हा उत्तरेस पंचवीस हजार हात लांब, पश्चिमेस दहा हजार हात रुंद, पूर्वेस दहा हजार हात रुंद, व दक्षिणेस पंचवीस हजार हात लांब असावा; परमेश्वराचे पवित्रस्थान ह्यामध्ये असणार.
11
याजकांपैकी जे सादोकवंशज पवित्र केले आहेत, ज्यांनी माझे नियम पाळले आहेत, व जे लेव्यांप्रमाणे इस्राएल वंशजांबरोबर बहकले नाहीत,
12
त्यांना देशातील समर्पित अंशातला एक अंश, म्हणजे अर्थात लेव्यांच्या विभागांतला एक परमपवित्र विभाग द्यावा;
13
आणि याजकांच्या विभागास लागून पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असा विभाग लेव्यांना मिळावा; त्याची सबंध लांबी पंचवीस हजार हात व रुंदी दहा हजार हात असावी.
14
त्यांनी त्यातला काही विकू नये व त्याची अदलाबदल करू नये; तसेच देशातील प्रथमफळे इतरांकडे जाऊ देऊ नयेत; कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे.
15
त्या पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पाच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक असून तो वस्तीसाठी व बखळीसाठी सोडावा; त्याच्यामध्ये नगर वसवावे.
16
त्याचे माप असे असावे: उत्तर बाजू साडेचार हजार हात, दक्षिण बाजू साडेचार हजार हात, पूर्व बाजू साडेचार हजार हात व पश्चिम बाजू साडेचार हजार हात.
17
नगराची बखळ उत्तरेस अडीचशे हात, दक्षिणेस अडीचशे हात, पूर्वेस अडीचशे हात, व पश्चिमेस अडीचशे हात असावी.
18
ह्या समर्पित प्रदेशाला लागून उरलेला जो प्रदेश त्याच्या उत्पन्नाने नगरातील कामधंदा करणार्यांचे पोषण व्हावे
19
इस्राएलच्या सर्व वंशांतील कामधंदा करणार्या नगरातल्या लोकांनी त्या भागाची मशागत करावी.
20
सगळे समर्पित क्षेत्र पंचवीस हजार हात लांब व पंचवीस हजार हात रुंद असावे; ह्या पवित्र समर्पित अंशाचा चतुर्थांश नगराच्या वतनासाठी द्यावा.
21
तो समर्पित भाग व नगराचे वतन ह्यांच्या अलीकडे-पलीकडे उरलेला भाग अधिपतीचा असावा; वंशाना दिलेल्या भागांना लागून पंचवीस हजार हात समर्पित जागेच्या पूर्व सीमेवर, तसेच पंचवीस हजार हात जागेच्या पश्चिम सीमेवर असलेले भाग अधिपतीचे असावेत; समर्पित भाग व मंदिराचे पवित्रस्थान हे त्या दोहो भागांच्या मध्ये असावेत.
22
ह्या प्रकारे लेव्यांचे वतन व नगराचे वतन ही अधिपतीच्या वतनाच्यामध्ये आहेत; हे अधिपतीचे वतन यहूदा प्रांत व बन्यामीन प्रांत ह्यांच्या दरम्यान आहे; हा भाग अधिपतीचा होय.
23
वरकड वंशांचा भाग पूर्वपश्चिम आहे; त्यांतला एक बन्यामिनाचा विभाग.
24
बन्यामिनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो शिमोनाचा विभाग.
25
शिमोनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो इस्साखाराचा विभाग.
26
इस्साखाराच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो जबुलूनाचा विभाग.
27
जबुलूनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो गादाचा विभाग.
28
दक्षिणेस गादाची सरहद्द तामारपासून मरीबथ-कादेश येथील पाण्यापर्यंत व मिसर देशाच्या नाल्याच्या बाजूने थेट मोठ्या समुद्रापर्यंत.
29
ही भूमी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलच्या वंशांना वतनासाठी वाटून द्यावी; हे त्यांचे विभाग आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
30
उत्तर दिशेस नगराबाहेरील रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे.
31
नगराच्या वेशी इस्राएल वंशांच्या नावांप्रमाणे असाव्यात: उत्तरेकडे तीन वेशी असाव्यात - रऊबेन वेस, यहूदा वेस व लेवी वेस.
32
पूर्व दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथे तीन वेशी असाव्यात: योसेफ वेस, बन्यामीन वेस व दान वेस.
33
दक्षिण दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात: शिमोन वेस, इस्साखार वेस व जबुलून वेस.
34
पश्चिम दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात: गाद वेस, आशेर वेस व नफताली वेस.
35
ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”
← Chapter 47
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48