bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ezekiel 39
Ezekiel 39
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 38
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 40 →
1
हे मानवपुत्रा, गोगाविरुद्ध संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे गोगा, रोश, मेशेख व तुबाल ह्यांच्या अधिपती, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे;
2
मी तुला माघारी फिरवीन, तुला घेऊन जाईन, उत्तरेच्या अतिशय दूर प्रदेशातून तुला यायला लावीन. तुला इस्राएलाच्या पर्वतांकडे आणीन;
3
मी तुझ्या डाव्या हातातले धनुष्य उडवून देईन; तुझ्या उजव्या हातातले बाण खाली पाडीन.
4
तू इस्राएलाच्या पर्वतांवर पडशील; तू, तुझे सर्व सेनासमूह आणि तुझ्याबरोबर असलेले लोकसमूह, हे तुम्ही सगळे पडाल; मी तुम्हांला नाना प्रकारच्या हिंस्र पक्ष्यांना व वनपशूंना भक्ष म्हणून खाण्यासाठी देईन.
5
उघड्या मैदानात तू पडशील, कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
6
मी मागोगात व द्वीपांत निर्भय राहणार्या लोकांत अग्नी पाठवीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
7
मी आपल्या इस्राएल लोकांत माझे पवित्र नाम प्रकट करीन; ह्यापुढे आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही; तेव्हा मी परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे असे राष्ट्रांना समजून येईल.
8
पाहा, हे प्राप्त होत आहे, घडून येत आहे; मी सांगितला तो हा दिवस आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
9
तेव्हा इस्राएलच्या नगरांतले रहिवासी बाहेर निघून ढाली व कवचे, धनुष्ये व बाण, गदा व भाले इत्यादी शस्त्रांना आग लावून जाळतील; त्यांचे त्यांना सात वर्षे सरपण होईल;
10
ते रानातून लाकडे आणणार नाहीत, जंगलांतले लाकूड तोडणार नाहीत; तर ही शस्त्रे ते जाळतील; त्यांना ज्यांनी लुटले त्यांना ते लुटतील व त्यांना ज्यांनी नागवले त्यांना ते नागवतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
11
त्या दिवशी असे होईल की मी समुद्राच्या पूर्वतीरी असलेले प्रवाशांचे खोरे गोगास इस्राएल देशात कबरस्तान म्हणून देईन; ते येणार्याजाणार्यांची वाट अडवील; तेथे गोग व त्याचा सर्व लोकसमूह ह्यांना पुरतील, आणि त्यास हमोन-गोग (गोगाचा लोकसमुदाय) ह्याचे खोरे असे म्हणतील.
12
देश शुद्ध करण्यासाठी इस्राएल घराणे त्यांना सात महिने पुरत राहील.
13
देशातले सर्व लोक त्यांना पुरतील; मी आपला महिमा प्रकट करीन त्या दिवशी हे त्यांच्या कीर्तीला कारण होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
14
हे काम नेहमी करणारे इसम ते वेगळे करून नेमतील आणि देश शुद्ध व्हावा म्हणून ते इसम देशभर हिंडून जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांना पुरतील; सात महिने लोटल्यावर ते शोधाला लागतील.
15
शोध करणारे देशातून हिंडत असता कोणाला मनुष्याची अस्थी आढळली तर पुरणार्यांनी ती हमोन-गोगच्या खोर्यात नेऊन पुरावी म्हणून तेथे निशाणी करून ठेवतील.
16
एका नगराचे नावही हमोना (समुदाय) असे ठेवतील; अशा प्रकारे ते देशाची शुद्धी करतील.
17
प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मानवपुत्रा, हरतर्हेच्या पक्ष्यांना व वनपशूंना सांग की जमा व्हा; या, मी तुमच्यासाठी यज्ञबली कापत आहे, इस्राएलाच्या पर्वतांवर महायज्ञ करत आहे; तेथे चोहोंकडून एकत्र होऊन मांस खा, रक्त प्या.
18
तुम्ही वीरांचे मांस खाल, पृथ्वीचे अधिपती आणि मेंढे, कोकरे, बोकड व बैल ह्यांचे रक्त प्याल; हे सर्व बाशान डोंगरात पोसलेले आहेत.
19
तुमच्यासाठी कापलेल्या माझ्या यज्ञपशूंची वपा तुम्ही तृप्ती होईपर्यंत खाल व त्यांचे रक्त पिऊन मस्त व्हाल.
20
माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, वीर व सर्व प्रकारचे योद्धे ह्यांना खाऊन तुमची तृप्ती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
21
तेव्हा राष्ट्रांमध्ये मी आपला महिमा स्थापीन; त्यांना शासन करीन व आपला हात त्यांच्यावर टाकीन, हे सगळी राष्ट्रे पाहतील.
22
त्या दिवसापासून पुढे मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल.
23
राष्ट्रांना समजेल की इस्राएल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले; त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला म्हणून मी त्यांच्यापासून आपले मुख लपवले आणि त्यांना त्यांच्या वैर्यांच्या हवाली केले, तेव्हा ते सर्व तलवारीने पडले.
24
त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे, त्यांच्या अपराधांप्रमाणे, मी त्यांच्याबरोबर वर्तलो आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवले.
25
ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आता मी याकोबाचा बंदिवास उलटवीन आणि इस्राएलाच्या अवघ्या घराण्यावर दया करीन; माझ्या पवित्र नामाची ईर्ष्या धरीन.
26
ते देशात निर्भय वसतील व कोणी त्यांना धाक घालणार नाही; मग ते लज्जित होतील; माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघाताचा त्यांना पस्तावा वाटेल.
27
मी त्यांना राष्ट्रांतून परत आणीन, त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना जमा करीन व बहुत राष्ट्रांसमक्ष त्यांच्या ठायी आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा हे घडेल.
28
मी त्यांना राष्ट्रांमध्ये हाकून देऊन पुन्हा मीच त्यांना त्यांच्या देशात परत आणले; त्यांच्यापैकी कोणालाही ह्यापुढे मी परदेशात राहू देणार नाही, हे पाहून मी परमेश्वर आहे असे ते समजतील;
29
मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
← Chapter 38
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 40 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48