bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Leviticus 13
Leviticus 13
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 14 →
1
परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले,
2
“एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;
3
मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा आणि त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास, आणि तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास, तो महारोगाचा चट्टा समजावा; अशा प्रकारे त्या मनुष्याची तपासणी करून याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे;
4
पण त्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असला व त्याच्या कातडीपेक्षा तो खोल गेलेला नसला व त्यावरचे केस पांढरे झालेले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या त्या माणसाला सात दिवस कोंडून ठेवावे;
5
मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे;
6
मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला असल्यास व तो कातडीत पसरला नसल्यास याजकाने त्याला शुद्ध ठरवावे. ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुऊन शुद्ध व्हावे.
7
तरीपण त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखवल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असल्यास त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.
8
याजकाने तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
9
एखाद्या मनुष्याला महारोगाचा चट्टा असल्यास त्याला याजकाकडे न्यावे;
10
याजकाने तपासणी करावी आणि जर त्याच्या कातडीला पांढरी सूज आली असली व त्यामुळे तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या ठिकाणाचे मांस नाजूक झालेले असेल,
11
तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; त्याला त्याने कोंडून ठेवू नये; कारण तो अशुद्धच होय.
12
एखाद्याच्या कातडीला कोड फुटून ते नखशिखांत सर्व कातडीवर पसरले आहे असे याजकाला दिसून आले,
13
तर त्याने तपासणी करावी आणि त्याच्या सर्वांगास कोड झाले असल्यास त्याने त्या चट्टा पडलेल्या मनुष्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्वांग शुभ्र झाले आहे, म्हणजेच तो शुद्ध होय.
14
पण जर त्याच्या अंगावर काही मांस कोवळे दिसून आले तर तो अशुद्ध समजावा.
15
याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
16
पण ते कोवळे मांस फिरून पांढरे झाले तर त्याने पुन्हा याजकाकडे यावे;
17
याजकाने त्याची तपासणी करावी, आणि जर त्याचा चट्टा फिरून पांढरा झाला असेल, तर त्याने त्या चट्टा पडलेल्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध होय.
18
कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला,
19
व फोडाच्या जागी पांढरी सूज आली अथवा तांबूस तकतकीत डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा;
20
याजकाने तपासणी करावी आणि जर कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झालेले असले, तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा होय.
21
पण तपासाअंती त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्या मनुष्याला सात दिवस कोंडून ठेवावे.
22
तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो रोगाची लागण आहे.
23
तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे; म्हणून याजकाने त्या मनुष्याला शुद्ध ठरवावे.
24
एखाद्याच्या कातडीत जळल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस तकतकीत किंवा नुसता पांढरा डाग दिसून येईल,
25
तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली असेल तर त्या जळालेल्या भागी महारोग फुटला आहे; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
26
पण तपासाअंती त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही, आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्याला सात दिवस कोंडून ठेवावे;
27
सातव्या दिवशी त्याने त्याची तपासणी करावी आणि तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
28
तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून कातडीवर पसरला नाही व तो बुजत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळालेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळालेल्या जागेवरचा वण होय.
29
एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल,
30
तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले, तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ही चाई डोक्याचा अथवा हनुवटीचा महारोग होय.
31
याजकाने हा चाईचा चट्टा तपासून पाहावा व तो कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या त्या मनुष्याला त्याने सात दिवस कोंडून ठेवावे;
32
सातव्या दिवशी त्याने ह्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी काही पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
33
तर त्या मनुष्याने मुंडण करावे; पण चाईवरचे केस काढून नयेत; याजकाने त्या चाई असलेल्या मनुष्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे.
34
सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी, आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत व शुद्ध व्हावे.
35
तरीपण तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली,
36
तर याजकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधत न बसता त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे.
37
परंतु ती चाई होती तेवढीच असून तिच्यावर काळे केस आले आहेत असे त्याला दिसून आले, तर ती चाई बरी झाली असून तो शुद्ध होय; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
38
कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत डाग म्हणजे पांढरे तकतकीत डाग असले,
39
तर याजकाने ते तपासावेत व त्याच्या अंगावरील कातडीतले ते तकतकीत डाग करडे असले तर ती कातडीवर फुटलेली दाद होय; तो मनुष्य शुद्ध होय.
40
कोणा मनुष्याच्या डोक्याचे केस गळून त्याला टक्कल पडले तरी तो शुद्ध होय.
41
त्याच्या कपाळाच्या वरच्या भागाचे केस गळून त्याला टक्कल पडले असले तरी तो शुद्ध होय.
42
तथापि त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर तांबूस पांढरा चट्टा पडला असेल तर त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर महारोग फुटत आहे.
43
मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर अंगावरील कातडीच्या महारोगासारखा वर आलेला तांबूस पांढरा चट्टा असल्याचे दिसले,
44
तर तो मनुष्य महारोगी असून अशुद्ध होय; याजकाने त्याला अवश्य अशुद्ध ठरवावे; त्याच्या डोक्यावर पडलेला तो महारोगाचा चट्टा होय.
45
ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावेत; त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावेत, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि ‘अशुद्ध, अशुद्ध’ असे ओरडत जावे.
46
जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.
47
एखाद्या वस्त्राला, मग ते लोकरीचे असो की सणाचे असो, महारोगाचा चट्टा पडला,
48
अथवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चामड्याला किंवा चामड्यापासून बनवलेल्या वस्तूला पडला,
49
आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूला पडलेला तो चट्टा हिरवट अथवा तांबूस असला, तर तो महारोगाचा चट्टा होय. तो याजकाला दाखवावा.
50
याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली वस्तू त्याने सात दिवस बंद करून ठेवावी;
51
नंतर त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासून पाहावा आणि वस्त्राच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, चामड्यावर किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते चढत जाणारे कुष्ठ समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.
52
ते वस्त्र लोकरीचे असो अथवा सणाचे असो, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यांवर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला, तर ती वस्तू जाळावी; ते पसरत जाणारे कुष्ठ असल्यामुळे ती वस्तू अग्नीत जाळून टाकली पाहिजे.
53
वस्त्रावर, ताण्यावर अथवा बाण्यावर किंवा चामड्याच्या केलेल्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा पसरलेला नाही असे याजकाला तपासणीनंतर दिसून आले,
54
तर चट्टा पडलेली वस्तू धुऊन टाकण्याची आज्ञा त्याने करावी आणि आणखी सात दिवस ती बंद करून ठेवावी.
55
मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो चट्टा पसरला नसला, तरी तो अशुद्ध समजावा; ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी; तो चट्टा आतील बाजूस असो किंवा बाहेरील बाजूस असो, ते पसरत जाणारे कुष्ठ समजावे.
56
पण धुतल्यानंतर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा किंवा ताण्याचा किंवा बाण्याचा तेवढाच भाग फाडून काढावा;
57
मग जर वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा त्याच्या बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा फुटून निघाला, तर चट्टा फुटलेली ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी.
58
वस्त्र, त्याचा ताणा किंवा त्याचा बाणा किंवा चामड्याची कोणतीही वस्तू धुतल्यावर त्यावरील तो चट्टा नाहीसा झाला तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी म्हणजे ती शुद्ध होईल.
59
लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरवण्याचा हा नियम होय.”
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27