bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Leviticus 3
Leviticus 3
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 4 →
1
कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करायचा असेल व तो गुराढोरांचा करायचा असेल तर यज्ञपशू नर असो किंवा मादी असो, तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा.
2
त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दाराशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
3
परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा: आतड्यांवर असलेली चरबी व त्यांना लागून असलेली सर्व चरबी,
4
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावीत.
5
हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर, विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
6
परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी शेरडामेंढरांचे अर्पण आणायचे असेल, ते नर असो किंवा मादी असो, त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे.
7
त्याला कोकराचे अर्पण करायचे असेल तर ते त्याने परमेश्वरासमोर अर्पावे.
8
त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा, आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
9
परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा: त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी,
10
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;
11
आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्यान्न होय.
12
कोणाला बकर्याचे अर्पण करायचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे.
13
त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
14
ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वराप्रीत्यर्थ होम करायचा तो भाग हा: आतड्यांवर असलेली चरबी, त्यांना लागून असलेली सर्व चरबी,
15
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी आणि गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;
16
आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय; कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे.
17
तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये, हा तुम्हांला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय.”
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27