bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Leviticus 24
Leviticus 24
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 25 →
1
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2
“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.
3
अहरोनाने दर्शनमंडपात साक्षीच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर नित्य संध्याकाळ-पासून सकाळपर्यंत त्याची व्यवस्था ठेवावी; हा तुमचा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
4
त्याने परमेश्वरासमोर शुद्ध दीपवृक्षावरील दिव्यांची व्यवस्था नित्य ठेवावी.
5
तू सपीठ घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.
6
त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा-सहा पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
7
प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेव म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल.
8
दर शब्बाथवारी त्याने परमेश्वरासमोर त्या नित्यनेमाने मांडाव्यात; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.
9
ही भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र स्थळी खावी; कारण निरंतरच्या विधीप्रमाणे परमेश्वराला अर्पण केलेल्या हव्यांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”
10
त्या काळी कोणा इस्राएल स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएल लोकांमध्ये गेला, तेव्हा तो आणि एक इस्राएल माणूस छावणीत भांडू लागले.
11
तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला तेव्हा त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ असे असून ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती.
12
त्याच्यासंबंधाने परमेश्वर काय सांगतो ते कळावे म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.
13
मग परमेश्वराने मोशेला सांगितले,
14
“तुम्ही त्या शिव्याशाप देणार्याला छावणीबाहेर घेऊन जा आणि जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत; नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा.
15
तू इस्राएल लोकांना सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.
16
जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला अवश्य दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला जिवे मारावे.
17
जर कोणी एखाद्याला ठार मारले तर त्याला अवश्य जिवे मारावे.
18
जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने त्याच्याबदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी.
19
कोणी आपल्या शेजार्याचा देह अधू करील तर त्याने जसे केले असेल तसेच त्याला करावे;
20
अवयवाबद्दल अवयव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे त्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल तशीच त्याला करावी.
21
पशू मारणार्याने त्याची भरपाई करावी; पण मनुष्यहत्या करणार्याला जिवे मारावे.
22
तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा, तुम्हा सर्वांना एकच नियम असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
23
मोशेने इस्राएल लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांनी त्या शिव्याशाप देणार्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27