bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Leviticus 7
Leviticus 7
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 8 →
1
दोषार्पणाचा विधी असा: हे अर्पण परमपवित्र होय.
2
ज्या ठिकाणी होमबलीचा वध करायचा त्याच ठिकाणी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
3
त्याची सर्व चरबी त्याने अर्पण करावी; त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी,
4
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत.
5
त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून होम करावा; हे दोषार्पण होय.
6
हा बली खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे; तो पवित्र स्थळी खावा; तो परमपवित्र होय.
7
पापार्पणासारखेच दोषार्पण; दोहोंचा विधी एकच. जो याजक त्याच्या द्वारे प्रायश्चित्त करील त्याचा त्याच्यावर हक्क आहे.
8
जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पण करील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे.
9
भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणार्या याजकाचे आहे.
10
प्रत्येक अन्नार्पण, तेलमिश्रित किंवा कोरडे, अहरोनाच्या सर्व मुलांचे होय; त्या सर्वांचा त्याच्यावर समान हक्क आहे.
11
परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करायचा असेल तर त्याचा विधी असा:
12
त्याला ते उपकारस्तुतीसाठी करायचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकारस्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्यात.
13
त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणांच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्यात.
14
ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एकेक पोळी अर्पावी; तिच्यावर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणार्या याजकाचा हक्क आहे.
15
उपकारस्तुतीसाठी त्याने केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये.
16
पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पण करील त्या दिवशी ते खावे; आणि जे काही त्यातले उरेल ते दुसर्या दिवशीही खावे;
17
त्या यज्ञबलीचे काही मांस तिसर्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
18
त्याच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही तिसर्या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही; उलट, ते अमंगळ ठरेल; आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल.1
19
ज्या मांसाला एखाद्या अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. जो कोणी शुद्ध असेल त्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;
20
पण कोणी आपल्या अशुद्धावस्थेत परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
21
कोणा मनुष्याने एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श केला, मग ती अशुद्धता मनुष्याची असो, पशूची असो किंवा दुसर्या कोणत्याही अमंगळ पदार्थाची असो, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस त्याने खाल्ले, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
22
परमेश्वर मोशेला म्हणाला,
23
“इस्राएल लोकांना असे सांग: तुम्ही बैलाची, मेंढराची अथवा बकर्याची चरबी खाऊ नये.
24
मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी इतर काही कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये.
25
परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून जो पशू अर्पण करतात त्याची चरबी कोणी खाल्ली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
26
तुम्ही आपापल्या निवासस्थानात पक्ष्याचे, जनावराचे वगैरे कसलेही रक्त खाऊ नये.
27
जो कोणी रक्त खाईल त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
28
परमेश्वर मोशेला म्हणाला,
29
“इस्राएल लोकांना असे सांग: जो कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पण करील त्याने त्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून काही भाग परमेश्वराकडे आणावा;
30
त्याने आपल्या हाताने परमेश्वराची हव्ये आणावीत, परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी चरबीसहित ऊर आणावा.
31
याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा.
32
तुम्ही आपल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीची उजवी मांडी समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
33
अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त आणि चरबी अर्पण करील त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा.
34
कारण इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही मी त्यांच्याकडून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्यांना दिली आहेत. ही दोन्ही इस्राएल लोकांकडून मिळणारे त्यांचे निरंतरचे हक्क होत.
35
याजक ह्या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले त्या दिवशी, परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा व त्याच्या मुलांचा अभिषेकाचा वाटा ठरला आहे;
36
ज्या दिवशी परमेश्वराने त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने त्यांना इस्राएल लोकांकडून हा वाटा मिळावा अशी आज्ञा केली, म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांचा हा निरंतरचा हक्क ठरला आहे.”
37
होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, (याजकाच्या) समर्पणाचे अर्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञबली ह्यांविषयीचा विधी हा;
38
इस्राएल लोकांनी परमेश्वराप्रीत्यर्थ काय अर्पणे करावीत ह्याविषयी परमेश्वराने त्यांना सीनाय रानात आज्ञा केली त्या दिवशी त्याने मोशेला वरीलप्रमाणे सीनाय पर्वतावर हा विधी लावून दिला.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27