bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Leviticus 9
Leviticus 9
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 10 →
1
आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले;
2
आणि त्याने अहरोनाला सांगितले, ‘पापार्पणासाठी एक दोषहीन गोर्हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर;
3
आणि इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा, आणि होमार्पणासाठी एक गोर्हा व एक कोकरू आणा, ही दोन्ही एका वर्षाची व दोषहीन असावीत;
4
आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हांला दर्शन देणार आहे.”
5
मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली.
6
तेव्हा मोशे म्हणाला, “तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली ते हेच; आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल.”
7
मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त घे; आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर.”
8
तेव्हा अहरोनाने वेदीजवळ जाऊन आपल्या पापार्पणाचा गोर्हा वधला.
9
मग अहरोनाचे मुलगे त्याच्याकडे रक्त घेऊन गेले, तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले आणि ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.
10
पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
11
मांस व कातडे त्याने छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
12
मग त्याने होमबली वधला; व त्याचे रक्त अहरोनाच्या मुलांनी त्याला सादर केले; त्याने ते घेऊन वेदीवर चहूकडे शिंपडले.
13
मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे करून एकेक तुकडा व त्याचे डोके ही त्याला सादर केली आणि त्यांचा त्याने वेदीवर होम केला.
14
त्याने त्याची आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला.
15
त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पण केला;
16
आणि त्याने होमबलीही जवळ नेऊन विधिपूर्वक अर्पण केला.
17
मग त्याने अन्नार्पण जवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन त्याचा वेदीवर होम केला; सकाळच्या होमार्पणासह हेही अर्पण करण्यात आले.
18
लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेले बैल आणि मेंढा हेही अहरोनाने वधले आणि त्याच्या मुलांनी त्यांचे रक्त त्याला सादर केले; ते त्याने वेदीवर सभोवती शिंपडले.
19
त्यांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, मेंढ्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर जे पसरलेले आहे ते, गुरदे आणि काळजावरील पडदा ही त्याला सादर केली;
20
आणि त्यांनी चरबी त्या बलींच्या उरांवर ठेवली मग तिचा वेदीवर होम केला.
21
तथापि ऊर आणि उजवी मांडी ही मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
22
मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला.
23
नंतर मोशे व अहरोन दर्शनमंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला, तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले.
24
आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27