bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Leviticus 27
Leviticus 27
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 26
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
1
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2
“इस्राएल लोकांना सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वराला माणसाचा विशेष नवस केला तर त्या मानवाचे मोल तू येणेप्रमाणे ठरवावे:
3
पुरुष वीस वर्षांपासून साठ वर्षांच्या आतील असला तर पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे त्याचे मोल पन्नास शेकेल रुपे असावे,
4
आणि स्त्री असली तर तिचे मोल तीस शेकेल असावे.
5
मुलगा पाच वर्षांहून मोठा व वीस वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल वीस शेकेल व मुलीचे दहा शेकेल असावे.
6
मुलगा एक महिन्याहून मोठा व पाच वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलगी असली तर तीन शेकेल रुपे असावे.
7
पुरुष साठ वर्षांहून अधिक वयाचा असला तर त्याचे मोल पंधरा शेकेल व स्त्री असल्यास दहा शेकेल असावे.
8
पण तू ठरवलेले मोल न देता येण्याइतका कोणी कंगाल असेल तर त्याला याजकापुढे उभे करावे, आणि याजकाने नवसाच्या माणसाचे मोल ठरवावे; नवस करणार्याच्या ऐपतीप्रमाणे याजकाने त्याचे मोल ठरवावे.
9
लोक परमेश्वराला जे पशू अर्पण करीत असतात त्यांपैकी एखाद्या पशूचा नवस केला, तर परमेश्वराला अर्पायचा असा प्रत्येक पशू पवित्र समजावा.
10
त्याने तो बदलू नये म्हणजे वाइटाऐवजी चांगला किंवा चांगल्याऐवजी वाईट असा बदल त्याने करू नये; त्याने एका पशूबद्दल दुसरा दिलाच तर तो व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावेत.
11
लोक परमेश्वराला जे पशू अर्पण करीत नसतात असल्या अशुद्ध पशूंपैकी तो असला तर त्याने तो पशू याजकापुढे उभा करावा,
12
त्या पशूचे गुणावगुण पाहून याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक म्हणून तू ठरवशील तितके त्याचे मोल समजावे.
13
पण नवस करणार्याने तो सोडवला तर तू ठरवलेल्या मोलात त्याने आणखी एक पंचमांश भर घालून तो सोडवावा.
14
एखाद्याने आपले घर परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिले तर याजकाने त्या घराचे गुणावगुण पाहून त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील तेवढे त्याचे मोल समजावे.
15
घर पवित्र करून वाहणारा मोल देऊन ते सोडवू पाहील तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे घर त्याचे होईल.
16
एखाद्याने आपल्या वतनाच्या शेताचा काही भाग परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिला, तर त्यात बियाणे पडेल त्या मानाने तू त्याचे मोल ठरवावे; एक होमरभर जवाची पेरणी त्यात होत असली तर त्या शेताचे मोल पन्नास शेकेल रुपे ठरवावे.
17
योबेलवर्षापासून त्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर तू ठरवशील त्याप्रमाणे त्याचे मोल कायम व्हावे.
18
योबेल झाल्यावर जर एखाद्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर पुढच्या योबेलवर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षांच्या मानाने याजकाने त्याचे मोल ठरवावे आणि तू ठरवलेल्या मोलातून तेवढे पैसे कमी करावेत.
19
शेत पवित्र करून वाहणारा मोल देऊन आपले शेत सोडवू पाहील, तर तू ठरवलेल्या मोलात आणखी एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे शेत कायमचे त्याचे होईल.
20
त्याने ते शेत सोडवले नसेल किंवा दुसर्या कोणाला ते विकले असेल, तर ते ह्यापुढे सोडवून घेता यायचे नाही;
21
पण योबेलवर्षी ते शेत सुटेल तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे वतन होईल.
22
स्वतःच्या वतनाचे नसलेले म्हणजे खरेदी केलेले शेत कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करू पाहील,
23
तर याजकाने योबेलवर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा आणि जितके मोल तू ठरवशील तितके परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र समजून त्याच दिवशी त्याने ते देऊन टाकावे.
24
ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्याने खरेदी केलेले असेल, म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल, त्याच्या ताब्यात ते योबेलवर्षी परत जावे.
25
ज्याचे मोल तू ठरवशील ते पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ठरवावे; शेकेल म्हणजे वीस गेरा.
26
ग्रामपशूंपैकी प्रथमवत्स परमेश्वराचा ठरलेला आहेच. त्याला कोणाला पवित्र करून वाहता येणार नाही; तो गुराढोरांपैकी असो किंवा शेरडामेंढरांपैकी असो, तो परमेश्वराचाच आहे.
27
तो वत्स अशुद्ध पशूचा असला, तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा; पण तो सोडवत नसला, तर तू ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
28
तथापि कोणी आपल्या सर्वस्वापैकी जे काही परमेश्वराला समर्पित करील, मग तो मानवप्राणी असो, पशू असो किंवा त्याच्या वतनाचे शेत असो, ते विकू नये किंवा सोडवू नये; जे काही समर्पित केले असेल ते परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र समजावे.
29
मानवप्राण्यांपैकी कोणाला वाहिले असेल, तर त्याला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
30
भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे, मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडांची फळे असोत; ते परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र होय.
31
एखाद्याला आपल्या दशमांशातील काही भाग मोल देऊन सोडवायचा असल्यास त्यात त्याने एक पंचमांशाची भर घालून तो सोडवावा.
32
गुरेढोरे अथवा शेरडेमेंढरे ह्यांपैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एकेक पशू परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असावा.
33
कोणी त्याचे गुणावगुण पाहू नयेत किंवा त्याला बदलू नये; कोणी त्याला बदललेच तर तो पशू व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावेत; मोल देऊन ते सोडवता येणार नाहीत.
34
परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी सीनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.
← Chapter 26
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27