bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Leviticus 14
Leviticus 14
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 15 →
1
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2
“महारोग्यास शुद्ध ठरवण्याच्या वेळचा नियम हा: त्याला याजकाकडे आणावे;
3
याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पाहावे, व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास
4
त्याने आज्ञा करावी की, ज्याला शुद्ध ठरवायचे आहे त्याच्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब1 हे घेऊन यावे;
5
मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यांतला एक पक्षी मारावा;
6
आणि जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब1 हे घेऊन जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात त्याने बुडवावे;
7
आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवायच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्ष्याला माळरानात सोडून द्यावे;
8
आणि शुद्ध ठरवायच्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करवावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे.
9
सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावेत; आपले कपडे धुवावेत व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल.
10
आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.
11
आणि शुद्ध ठरवणार्या याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारी उभे करावे.
12
मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरू आणि एक लोगभर तेल अर्पावे आणि ते परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावे.
13
आणि पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरू मारावे; कारण पापबलीप्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र होय.
14
मग याजकाने दोषबलीचे थोडे रक्त घेऊन शुद्ध ठर-वायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला ते लावावे.
15
याजकाने लोगभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
16
मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले थोडे परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे.
17
त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले थोडे घेऊन याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे;
18
याजकाच्या तळहातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे.
19
मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्धतेपासून शुद्ध ठरवायच्या त्या मनुष्यासाठी प्रायश्चित्त करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा.
20
याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
21
तो गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसली तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे, आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले एक दशांश एफा सपीठ आणि लोगभर तेल आणावे;
22
आणि ऐपतीप्रमाणे दोन होले अथवा पारव्याची दोन पिले त्याने आणावीत; त्यांतील एक पापबली व एक होमबली व्हावा.
23
आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने हे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
24
मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.
25
त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे थोडे रक्त घेऊन शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे;
26
याजकाने त्या तेलातले थोडे आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
27
मग त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या तळहातावरील थोडे तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.
28
मग याजकाने आपल्या तळहातावरील थोडे तेल घेऊन शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या अंगठ्यावर व उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोषबलीचे रक्त लावलेल्या जागी लावावे;
29
याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून लावावे.
30
त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;
31
त्याला जे पक्षी मिळाले असतील त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसर्याचे अन्नार्पणासहित होमार्पण करावे; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे.
32
अंगावर महारोगाचा चट्टा असलेल्या ज्या मनुष्याला आपल्या शुद्धीकरणाची सामग्री मिळवण्याची ऐपत नसेल त्याच्यासंबंधीचा हा नियम होय.”
33
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,
34
“जो कनान देश मी तुम्हांला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहचाल तेव्हा तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,
35
तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते.
36
मग याजकाने आज्ञा करावी की, मी आत जाऊन चट्टा तपासण्यापूर्वी घर रिकामे करावे; नाहीतर घरातील सर्वच वस्तू अशुद्ध ठरायच्या. नंतर याजकाने आत जाऊन घर तपासावे.
37
तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट अथवा तांबूस रेषा पडल्या असल्या आणि भिंतीत त्या खोलवर गेल्या असल्या,
38
तर याजकाने घराबाहेर दाराशी यावे आणि ते घर सात दिवस बंद करून ठेवावे.
39
मग सातव्या दिवशी याजकाने ते घर पुन्हा जाऊन तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतींवर पसरला असल्यास,
40
याजकाने आज्ञा करावी की, चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावेत;
41
आणि घर आतून सगळीकडून खरवडावे आणि खरवडून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध स्थळी टाकून द्यावा,
42
आणि त्या दगडांच्या ऐवजी दुसरे दगड बसवावेत आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.
43
दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला,
44
तर याजकाने आत येऊन तो तपासावा. घरात तो चट्टा पसरला असल्यास ते घराचे पसरत जाणारे कुष्ठ आहे; ते अशुद्ध होय.
45
मग त्याने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावा.
46
आणि घर बंद असताना कोणी त्यात शिरला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा;
47
आणि कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावेत, त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्यानेही आपले कपडे धुवावेत.
48
याजकाने आत जाऊन घर तपासावे आणि घराला गिलावा केल्यावर चट्टा परत उद्भवला नसला, तर त्याचा तो चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.
49
त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब हे त्याने आणावे;
50
त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;
51
मग त्याने गंधसरूचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात आणि वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;
52
त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी रंगाचे कापड ह्यांच्या योगे त्याने ते घर शुद्ध करावे.
53
मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर माळरानात सोडून द्यावा; ह्या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित्त केले म्हणजे ते शुद्ध ठरेल.”
54
सर्व प्रकारच्या महारोगाचे चट्टे, चाई,
55
कपड्यावरील अथवा घराचा महारोग,
56
सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वांसंबंधीचा हा नियम;
57
ही केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे शिकवण्यासंबंधीचा हा महारोगाविषयीचा नियम होय.”
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27