bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Numbers 1
Numbers 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 2 →
1
इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वर सीनाय रानातील दर्शनमंडपात मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2
“इस्राएल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर; त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून नावांच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर;
3
वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे जितके इस्राएल पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वांची त्यांच्या-त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.
4
प्रत्येक वंशातला एकेक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या.
5
तुमच्याबरोबर जे असावेत त्यांची नावे ही: रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;
6
शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल;
7
यहूदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;
8
इस्साखार वंशातला सूवाराचा मुलगा नथनेल;
9
जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;
10
योसेफपुत्रांच्या वंशात म्हणजे एफ्राईम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल;
11
बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान;
12
दान वंशातला अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर;
13
आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पगीयेल;
14
गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;
15
नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा.”
16
मंडळीतून जे पुरुष निवडले ते हे; ते आपापल्या पूर्वजांच्या वंशाचे सरदार असून इस्राएलाच्या हजार-हजारांच्या पथकांचे1 प्रमुख होते.
17
ज्यांची नावे वर नमूद केली त्यांना मोशे व अहरोन ह्यांनी बरोबर घेतले,
18
आणि दुसर्या महिन्याच्या प्रतिपदेस सर्व मंडळी जमवली; तेव्हा इस्राएल लोकांनी आपापले कूळ व आपापल्या वाडवडिलांचे घराणे ह्यांना अनुसरून वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे जितके पुरुष होते त्यांची शिरगणती करून आपल्या नावांच्या अनुक्रमाने आपली वंशावळ सांगितली.
19
परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.
20
इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची शिरगणती त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
21
रऊबेन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती शेहेचाळीस हजार पाचशे भरली.
22
शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
23
शिमोन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकोणसाठ हजार तीनशे भरली.
24
गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
25
गाद वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली.
26
यहूदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
27
यहूदा वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौर्याहत्तर हजार सहाशे भरली.
28
इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
29
इस्साखार वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौपन्न हजार चारशे भरली.
30
जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
31
जबुलून वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती सत्तावन्न हजार चारशे भरली.
32
योसेफपुत्रांपैकी एफ्राईम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
33
एफ्राईम वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चाळीस हजार पाचशे भरली.
34
मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
35
मनश्शे वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती बत्तीस हजार दोनशे भरली.
36
बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
37
बन्यामीन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती पस्तीस हजार चारशे भरली.
38
दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
39
दान वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती बासष्ट हजार सातशे भरली.
40
आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
41
आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकेचाळीस हजार पाचशे भरली.
42
नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;
43
नफताली वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती त्रेपन्न हजार चारशे भरली.
44
मोशे आणि अहरोन आणि इस्राएलाचे बारा सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख होते त्यांनी जी गणती केली ती इतकी भरली.
45
ह्या प्रकारे इस्राएल लोकांपैकी त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून इस्राएलात जे युद्धास लायक होते अशा ज्या सर्वांची नोंद झाली,
46
त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास भरली.
47
परंतु लेव्यांची इतरांबरोबर त्यांच्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे नोंद करण्यात आली नाही.
48
कारण परमेश्वर मोशेला म्हणाला होता की,
49
“इस्राएल लोकांपैकी फक्त लेवी वंशाची गणती करू नये; इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करू नये;
50
तर साक्षपटाच्या निवासमंडपावर, त्यातील सर्व सामानावर व त्यासंबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव; निवासमंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे, त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवासमंडपाभोवती ठोकावेत.
51
निवासमंडप पुढे न्यायचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा; आणि तो उभा करताना लेव्यांनीच तो उभा करावा; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.
52
इस्राएल लोकांनी आपापले डेरे आपापल्या दलांनुसार आपापल्या छावणीत आपापल्या निशाणाजवळ ठोकावेत;
53
पण लेव्यांनी आपले डेरे साक्षपटाच्या निवासमंडपासभोवती ठोकावेत म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही; आणि लेव्यांनी साक्षपटाच्या निवासमंडपाचे रक्षण करावे.”
54
इस्राएल लोकांनी ह्याप्रमाणे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्वकाही केले.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36