bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Numbers 7

← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 8 →
1
मग मोशेने निवासमंडप उभा करण्याचे संपवले आणि तो मंडप व त्यातील सर्व सामान हे तैलाभ्यंग करून पवित्र केले, आणि वेदी व तिची सर्व उपकरणे हीसुद्धा तैलाभ्यंग करून पवित्र केली;
2
तेव्हा असे झाले की, इस्राएलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली; हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती;
3
त्यांनी परमेश्वराला अर्पण आणले ते हे: आच्छादलेल्या सहा गाड्या आणि बारा बैल म्हणजे दोघा-दोघा सरदारांमागे एक गाडी आणि प्रत्येक सरदारामागे एक बैल; त्यांनी ती निवासमंडपासमोर सादर केली.
4
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
5
“त्यांच्यापासून ती स्वीकार म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग होईल आणि ती लेव्यांना ज्याच्या-त्याच्या सेवेप्रमाणे वाटून दे.”
6
तेव्हा मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेव्यांना दिले.
7
गेर्षोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे दोन गाड्या आणि चार बैल दिले.
8
मरारीच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे चार गाड्या व आठ बैल दिले; हे अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली होते.
9
पण कहाथाच्या वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्रस्थानातल्या वस्तू खांद्यांवर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती.
10
वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या. म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले.
11
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की, “वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे.”
12
पहिल्या दिवशी ज्याने अर्पण सादर केले तो यहूदा वंशातील अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन होता.
13
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
14
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
15
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
16
पापार्पणासाठी एक बकरा;
17
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याचे अर्पण होते.
18
दुसर्या दिवशी इस्साखाराच्या वंशजांचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल ह्याने अर्पण सादर केले.
19
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
20
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
21
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
22
पापार्पणासाठी एक बकरा;
23
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे सूवाराचा मुलगा नथनेल ह्याचे अर्पण होते.
24
तिसर्या दिवशी जबुलूनाच्या वंशजांचा सरदार हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने अर्पण सादर केले.
25
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
26
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
27
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
28
पापार्पणासाठी एक बकरा;
29
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याचे अर्पण होते.
30
चौथ्या दिवशी रऊबेनाच्या वंशजांचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने अर्पण सादर केले.
31
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
32
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
33
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
34
पापार्पणासाठी एक बकरा;
35
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते.
36
पाचव्या दिवशी शिमोनाच्या वंशजांचा सरदार सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीएल ह्याने अर्पण सादर केले.
37
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
38
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
39
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
40
पापार्पणासाठी एक बकरा;
41
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याचे अर्पण होते.
42
सहाव्या दिवशी गादाच्या वंशजांचा सरदार दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने अर्पण सादर केले.
43
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
44
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
45
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
46
पापार्पणासाठी एक बकरा;
47
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते.
48
सातव्या दिवशी एफ्राइमाच्या वंशजांचा सरदार अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने अर्पण सादर केले.
49
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
50
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
51
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
52
पापार्पणासाठी एक बकरा;
53
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याचे अर्पण होते.
54
आठव्या दिवशी मनश्शेच्या वंशजांचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने अर्पण सादर केले.
55
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
56
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
57
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
58
पापार्पणासाठी एक बकरा;
59
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याचे अर्पण होते.
60
नवव्या दिवशी बन्यामीनाच्या वंशजांचा सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याने अर्पण सादर केले.
61
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
62
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
63
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
64
पापार्पणासाठी एक बकरा;
65
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.
66
दहाव्या दिवशी दानाच्या वंशजांचा सरदार अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने अर्पण सादर केले.
67
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
68
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
69
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
70
पापार्पणासाठी एक बकरा;
71
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते.
72
अकराव्या दिवशी आशेराच्या वंशजांचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने अर्पण सादर केले.
73
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
74
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
75
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
76
पापार्पणासाठी एक बकरा;
77
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याचे अर्पण होते.
78
बाराव्या दिवशी नफतालीच्या वंशजांचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा ह्याने अर्पण सादर केले.
79
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
80
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
81
होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
82
पापार्पणासाठी एक बकरा;
83
शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे एनानाचा मुलगा अहीरा ह्याचे अर्पण होते.
84
वेदीला तैलाभ्यंग झाला त्या दिवशी इस्राएल लोकांच्या सरदारांकडून तिच्या समर्पणाचे अर्पण झाले ते हे: चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे व सोन्याची बारा धूपपात्रे;
85
प्रत्येक चांदीचे ताट एकशे तीस शेकेलांचे व प्रत्येक चांदीचा कटोरा सत्तर शेकेलांचा अशी एकंदर सर्व चांदीची पात्रे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती;
86
धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती; सर्व धूपपात्रांचे सोने एकशे वीस शेकेल होते;
87
होमार्पणासाठी एकंदर बारा गोर्हे, बारा मेंढे, वर्षावर्षाची नरजातीची बारा कोकरे, ही त्यांच्या बरोबरच्या अन्नार्पणासह होती; तसेच पापार्पणासाठी बारा बकरे होते;
88
शांत्यर्पणासाठी एकंदर चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे आणि वर्षावर्षाची नरजातीची साठ कोकरे होती. वेदीला तैलाभ्यंग झाल्यावर तिच्या समर्पणाचे हे अर्पण होते.
89
मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शनमंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करूबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली; ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36