bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Numbers 8
Numbers 8
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 9 →
1
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2
“अहरोनाला सांग की, तू दिवे पेटवशील तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा.”
3
अहरोनाने तसे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले.
4
दीपवृक्षाचे काम घडीव सोन्याचे होते; बैठकीपासून फुलांपर्यंत घडीव काम होते; परमेश्वराने मोशेला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे त्याने तो दीपवृक्ष घडवला होता.
5
परमेश्वर मोशेला म्हणाला,
6
“इस्राएल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर.
7
तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर: पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर; मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्तरा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावीत आणि स्वत:ला शुद्ध करावे.
8
मग त्यांनी एक गोर्हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे; आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोर्हा आणावा.
9
मग तू लेव्यांना दर्शनमंडपासमोर सादर करावे आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी;
10
लेव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करत असताना इस्राएल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत;
11
लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्राएल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे.1
12
तेव्हा लेव्यांनी आपले हात गोर्ह्याच्या डोक्यांवर ठेवावेत; आणि लेव्यांप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यासाठी तू एक गोर्हा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा.
13
मग लेव्यांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर उभे करून परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पावे.
14
ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्राएल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील.
15
तू लेव्यांना शुद्ध करून ओवाळणी म्हणून अर्पण केल्यानंतर त्यांनी सेवा करायला दर्शनमंडपात जावे.
16
कारण इस्राएल लोकांमधून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत; उदरातून प्रथम निघणार्या अर्थात इस्राएल लोकांच्या प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी त्यांना आपले करून घेतले आहे.
17
कारण इस्राएल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व नर माझेच आहेत; मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारले त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले.
18
इस्राएल लोकांतील प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे.
19
दर्शनमंडपात इस्राएल लोकांसाठी सेवा करायला व इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित्त करायला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्राएल लोकांतून लेवी दान म्हणून मी दिले आहेत; म्हणजे इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये.”
20
मोशे, अहरोन आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी ह्यांनी ह्या प्रकारे लेव्यांना केले; परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी त्यांचे सर्वकाही केले.
21
लेवी आपल्या पापाचे क्षालन करून शुद्ध झाले; त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पण केले; आणि त्यांना शुद्ध करण्याकरता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्चित्त केले.
22
त्यानंतर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर लेवी आपापली सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात गेले. लेव्यां-संबंधाने परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे केले.
23
परमेश्वर मोशेला म्हणाला,
24
“लेव्यांसंबंधीचा नियम हा: वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शनमंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा;
25
ते पन्नास वर्षांचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढे ही सेवा त्यांनी करू नये;
26
पण त्यांनी आपल्या भाऊबंदांसह दर्शनमंडपात रक्षकाचे काम करावे, दुसरी काही सेवा करू नये. लेव्यांना सोपवलेल्या कामासंबंधाने तू त्यांचे असे करावे.”
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36