bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Numbers 28
Numbers 28
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 29 →
1
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2
“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.
3
आणखी तू त्यांना सांग, परमेश्वराप्रीत्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पायचे ते हे: नित्य होमार्पणासाठी रोज एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे.
4
एक कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे.
5
आणि हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
6
हा नित्याचा होमबली परमेश्वराला सुवासिक हव्य व्हावा असे सीनाय पर्वतावर विहित केले होते.
7
त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावेस.
8
दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे; सकाळचे अन्नार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याप्रमाणे ते परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून अर्पावे.
9
दर शब्बाथ दिवशी एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरचे पेयार्पण ही अर्पावीत.
10
नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज आणखी हा होमबली दर शब्बाथ दिवशी अर्पावा.
11
प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे अर्पावीत;
12
प्रत्येक गोर्ह्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ, आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ,
13
आणि प्रत्येक कोकरामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पण करावे; हा सुवासिक होमबली परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होईल.
14
त्यांबरोबरची पेयार्पणे ही असावीत. गोर्ह्यामागे अर्धा हिन, मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन आणि कोकरामागे एक चतुर्थांश हिन द्राक्षारस. वर्षातील प्रत्येक महिन्यात होमबली अर्पायचा तो हा होय.
15
आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज परमेश्वराप्रीत्यर्थ पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
16
पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा.
17
तसाच ह्या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा. सात दिवस बेखमीर भाकर खावी.
18
पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
19
ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ एक हव्य म्हणजे होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत.
20
त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा अर्पावे;
21
आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे;
22
तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरता एक बकरा अर्पावा.
23
सकाळचे होमार्पण म्हणजे नित्य होमार्पण, ह्याखेरीज हीदेखील अर्पावीत.
24
ह्या प्रकारे सात दिवसपर्यंत दररोज तुम्ही परमेश्वराला सुवासिक हव्यान्न अर्पावे; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांशिवाय आणखी हेदेखील अर्पावे.
25
सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
26
सप्ताहाच्या सणात प्रथमपीक अर्पण करण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वराला नव्या अन्नाचे अर्पण कराल तेव्हा पवित्र मेळा भरवावा, त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
27
पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे;
28
आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; प्रत्येक गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,
29
आणि त्या सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे;
30
तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून एक बकरा अर्पावा.
31
ही दोषहीन असावीत; आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण ह्यांखेरीज ही व ह्यांबरोबरची पेयार्पणे अर्पावीत.
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 29 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36