bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Numbers 24
Numbers 24
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 25 →
1
इस्राएलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसले असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकुन पाहायला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले.
2
बलामाने दृष्टी वर करून पाहिले तर, इस्राएल लोक आपापल्या वंशांप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले; देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला.
3
तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;
4
जो देवाची वचने श्रवण करतो ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे:
5
हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्राएला, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत!
6
खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.
7
त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.
8
देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे; त्याचे बळ रानबैलाच्या बळासारखे आहे; तो आपल्या शत्रुराष्ट्रांना ग्रासून टाकील, त्यांच्या हाडांचा चुराडा करील, आपल्या बाणांनी त्यांना छेदून टाकील.
9
तो सिंहाप्रमाणे, सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील? जो तुझे अभिष्ट चिंतील, त्याचे अभिष्ट होईल; जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल.”
10
तेव्हा बलामावर बालाकाचा क्रोध भडकला; तो हात आपटून बलामाला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलावून आणले, पण तू तर तीनही वेळा त्यांना आशीर्वादच दिलास;
11
तेव्हा तू आता येथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा; ‘तुझा मोठा सन्मान करीन’ असे मी म्हटले होते, पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आला आहे.”
12
बलाम बालाकाला म्हणाला, “तू माझ्याकडे पाठवलेल्या दूतांनासुद्धा मी असे सांगितले नव्हते काय की,
13
‘बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले तरी परमेश्वराच्या शब्दाबाहेर मला आपल्याच मनाने बरेवाईट काहीही करता येणार नाही, परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन?’
14
पाहा, आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच, तरी चल, हे लोक शेवटल्या दिवसांत तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवतो.”
15
मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;
16
जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो व ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे:
17
मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.
18
त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील तोवर इस्राएल आपला प्रभाव दाखवील.
19
याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील.”
20
मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”
21
मग केनी राष्ट्राला उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “तुझे वसतिस्थान तर मजबूत आहे, तुझे घरटे खडकात आहे;
22
तरी काइन1 उजाड होईल. अश्शूर तुला बंदिवान करून नेण्यास किती विलंब लावील?”
23
तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, “हाय! हाय! देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल?
24
तरी कित्ती ह्यांच्या किनार्यावरून जहाजे येतील, ती अश्शूरास व एबेरास त्रस्त करतील; तरी शेवटी त्यांचाही नाश होईल.”
25
तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36