bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Numbers 29
Numbers 29
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 28
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 30 →
1
सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये; हा तुमचा कर्णे वाजवण्याचा दिवस होय.
2
परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून एक गोर्हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावीत;
3
त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,
4
आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे,
5
आणि तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरता एक बकरा अर्पावा;
6
अमावस्येचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्यांबरोबरची पेयार्पणे ह्या सर्वांखेरीज हे अर्पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून विधिपूर्वक अर्पावे.
7
ह्या सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे व कसलेच काम करू नये.
8
परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे: एक गोर्हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत;
9
त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,
10
आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे;
11
प्रायश्चित्ताचे पापार्पण, नित्य होमार्पण व त्याबरोबर त्याचे अन्नार्पण आणि त्यांबरोबरची पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
12
सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावा;
13
परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे: तेरा गोर्हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे; ही दोषहीन असावीत.
14
त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; तेरा गोर्ह्यांपैकी प्रत्येक गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेढ्यांपैकी प्रत्येक मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,
15
आणि चौदा कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे;
16
तसेच पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज हे अर्पण करावे.
17
दुसर्या दिवशी बारा गोर्हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;
18
त्यांबरोबर गोर्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;
19
नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि त्यांबरोबरची पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
20
तिसर्या दिवशी अकरा गोर्हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;
21
त्यांबरोबर गोर्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;
22
नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
23
चौथ्या दिवशी दहा गोर्हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;
24
त्यांबरोबर गोर्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;
25
नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
26
पाचव्या दिवशी नऊ गोर्हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;
27
त्यांबरोबर गोर्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;
28
नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
29
सहाव्या दिवशी आठ गोर्हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;
30
त्यांबरोबर गोर्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;
31
नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
32
सातव्या दिवशी सात गोर्हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;
33
त्यांबरोबर गोर्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;
34
नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
35
आठव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळ्याचा समारोप करावा; ह्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
36
परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते असे: एक गोर्हा, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे;
37
त्यांबरोबर गोर्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;
38
नित्य होमार्पण व त्यांबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
39
तुमचे नवस व स्वखुशीची अर्पणे ह्यांखेरीज नेमलेल्या सणात हे होमबली, अन्नार्पणे, पेयार्पणे आणि शांत्यर्पणे परमेश्वराला अर्पावीत.”
40
परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सर्वकाही इस्राएल लोकांना कळवले.
← Chapter 28
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 30 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36