bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Numbers 2
Numbers 2
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 3 →
1
परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले,
2
“दर्शनमंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्राएल लोकांनी आपापल्या निशाणाजवळ व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजाजवळ आपले डेरे द्यावेत.
3
पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकायचे ते यहूदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावेत; यहूदा वंशाचा सरदार अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा;
4
त्याच्या दलाची जी मोजदाद झाली ती चौर्याहत्तर हजार सहाशे होती.
5
त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते इस्साखार वंशातले लोक असावेत; इस्साखार वंशाचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल असावा;
6
त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती चौपन्न हजार चारशे होती.
7
मग जबुलून वंशातील लोक; जबुलून वंशाचा सरदार हेलोनाचा मुलगा अलीयाब असावा;
8
त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती सत्तावन्न हजार चारशे होती.
9
ह्या प्रकारे यहूदा वंशाच्या छावणीत त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष शहाऐंशी हजार चारशे होती. कूच करताना ह्यांनीच अग्रभागी चालावे.
10
दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; रऊबेन वंशाचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर असावा.
11
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती शेहेचाळीस हजार पाचशे होती.
12
त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते शिमोन वंशातले लोक असावेत; शिमोन वंशाचा सरदार सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल असावा;
13
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती एकोणसाठ हजार तीनशे होती.
14
मग गाद वंशाचे लोक; गाद वंशाचा सरदार रगुवेलाचा मुलगा एल्यासाप असावा;
15
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास होती.
16
ह्या प्रकारे रऊबेन वंशाच्या छावणीत त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष एकावन्न हजार चारशे पन्नास होती. कूच करताना त्यांची रांग दुसरी असावी.
17
मग सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा; ज्या क्रमाने ते डेरे ठोकतील त्याच क्रमाने त्यांनी आपापल्या जागी आपापल्या निशाणांजवळ राहून कूच करावे.
18
पश्चिम बाजूस एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; एफ्राईम वंशाचा सरदार अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा हा असावा;
19
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती चाळीस हजार पाचशे होती.
20
त्यांच्याशेजारी मनश्शे वंशाचे डेरे ठोकावेत आणि मनश्शे वंशाचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीयेल हा असावा;
21
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती बत्तीस हजार दोनशे होती.
22
मग बन्यामीन वंशाचे लोक; बन्यामीन वंशाचा सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा;
23
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती पस्तीस हजार चारशे होती.
24
ह्या प्रकारे एफ्राईम वंशाच्या छावणीत त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष आठ हजार शंभर होती. कूच करताना त्यांची रांग तिसरी असावी.
25
उत्तर बाजूस दान वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलाप्रमाणे राहावे; दान वंशाचा सरदार अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा असावा.
26
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती बासष्ट हजार सातशे होती.
27
त्यांच्याशेजारी आशेर वंशाचे डेरे ठोकावेत, आणि आशेर वंशाचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल हा असावा.
28
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती एकेचाळीस हजार पाचशे होती.
29
मग नफताली वंशाचे लोक; नफताली वंशाचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा हा असावा;
30
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती त्रेपन्न हजार चारशे होती.
31
ह्या प्रकारे दान वंशाच्या छावणीत त्या सर्वांची जी मोजदाद झाली, ती एक लक्ष सत्तावन्न हजार सहाशे होती. कूच करताना ह्यांनी आपली निशाणे घेऊन सर्वांच्या पिछाडीस चालावे.”
32
इस्राएल वंशातील ज्या लोकांची त्यांच्या-त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे मोजदाद झाली ती ही. त्यांच्या छावण्यांतील त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे ज्या सर्वांची मोजदाद करण्यात आली, त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास होती.
33
परंतु परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे लेवी वंशाची गणती इस्राएल लोकांबरोबर झाली नाही.
34
त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते आपापली कुळे व आपापल्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्या अनुक्रमाने आपापल्या निशाणाजवळ डेरे ठोकत आणि कूच करीत.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36