bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Exodus 24
Exodus 24
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 25 →
1
मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा.
2
एकट्या मोशेने मात्र परमेश्वरासमीप यावे; बाकीच्यांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये.”
3
मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि नियम लोकांना सांगितले, तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, “जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू.”
4
मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी त्याने एक वेदी बांधली, आणि इस्राएलाच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले.
5
त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले, आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली.
6
मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोर्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर शिंपडले.
7
मग त्याने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांना वाचून दाखवला; ते ऐकून ते म्हणाले, “जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.”
8
नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले, आणि म्हटले, “पाहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुमच्याशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय.”
9
मग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण वर चढून गेले.
10
त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; त्याच्या पायांखाली नीलकांत मण्यांच्या चबुतर्यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते.
11
पण इस्राएल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारला नाही; त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले. सीनाय पर्वतावर मोशे
12
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा; मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो.”
13
तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला.
14
मोशे वडिलांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच आमची वाट पाहत राहा; पाहा, अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असले तर ते त्याने त्यांच्याकडे न्यावे.”
15
मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून टाकला.
16
परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने सहा दिवस तो झाकून टाकला आणि सातव्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारली.
17
पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणार्या अग्नीसारखे इस्राएल लोकांना दिसत होते.
18
मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला; मोशे पर्वतावर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40