bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Exodus 28
Exodus 28
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 29 →
1
तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्यांना इस्राएल लोकांतून आपल्याजवळ आण.
2
आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर.
3
आणि जे ज्ञानी आहेत ते म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना तू अहरोनाची वस्त्रे तयार करायला सांग; त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल.
4
त्यांनी तयार करायची वस्त्रे ही: ऊरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदील व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावीत. एफोद
5
त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड घ्यावे.
6
सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद कुशल कारागिराकडून तयार करून घ्यावे.
7
त्याच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात व त्याची दोन टोके जोडावीत.
8
एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी.
9
मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांवर इस्राएलांच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावीत;
10
त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसर्या रत्नावर कोरावीत.
11
रत्नांवर कोरीव काम करणार्याच्या कसबाने मुद्रा कोरली जाते त्याप्रमाणे त्या दोन्ही रत्नांवर इस्राएलांच्या मुलांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवावीत.
12
ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावीत, ती इस्राएल लोकांची स्मारकरत्ने होत, म्हणजे अहरोन त्यांची नावे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांद्यांवर स्मरणार्थ वागवील.
13
त्याचप्रमाणे सोन्याची जाळीदार कोंदणे करावीत.
14
पीळ घातलेल्या दोरीसारख्या दोन साखळ्या शुद्ध सोन्याच्या कराव्यात आणि त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणांत बसवाव्यात.
15
न्यायाचा ऊरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा, तो एफोदाप्रमाणे करावा; तो सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा, कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा.
16
तो चौरस व दुहेरी असावा, त्याची लांबी व रुंदी एकेक वीत असावी.
17
त्यात रत्ने जडवावीत. त्यात रत्नांच्या चार रांगा असाव्यात. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
18
दुसर्या रांगेत पाचू, नीलकांत मणी व हिरा;
19
तिसर्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
20
आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावीत.
21
इस्राएलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत, त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत, मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.
22
दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या ऊरपटावर लावाव्यात.
23
ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात, त्या दोन्ही कड्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात.
24
ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या ह्या दोन कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घालाव्यात.
25
पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणांत घालून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढील भागी लावाव्यात.
26
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना म्हणजे एफोदाच्या आतल्या बाजूला असलेल्या काठावर लावाव्यात.
27
आणि सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांना खालच्या बाजूला त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावाव्यात.
28
त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने बांधाव्यात; ह्याप्रमाणे तो कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर राहील, आणि ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.
29
अहरोन पवित्रस्थानी प्रवेश करील तेव्हा तो न्यायाच्या ऊरपटावर, म्हणजे आपल्या हृदयावर इस्राएलाच्या मुलांची नावे धारण करील व त्यायोगे परमेश्वरासमोर त्यांचे स्मरण नित्य राहील.
30
तू न्यायाच्या ऊरपटात उरीम व थुम्मीम1 ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे; ह्या प्रकारे अहरोनाने इस्राएल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा.
31
एफोदाबरोबर घालायचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा.
32
त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे, आणि त्याच्या सभोवती चिलखताच्या भोकाला असतो तसा विणलेला गोट असावा म्हणजे झगा फाटायचा नाही.
33
त्याच्या खालच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे काढावीत आणि त्यांच्या दरम्यान सभोवती सोन्याची घुंगरे लावावीत,
34
म्हणजे एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब, पुन्हा एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब अशी झग्याच्या खालच्या घेरात सभोवती असावीत.
35
सेवा करतेवेळी तो झगा अहरोनाने घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा तो घुंगरांचा आवाज ऐकू यावा, म्हणजे तो मरणार नाही.
36
शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि जशी मुद्रा कोरतात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरावीत: ‘परमेश्वरासाठी पवित्र’
37
आणि ती निळ्या फितीला अडकवून मंदिलाला लावावी, म्हणजे ती मंदिलावर राहील; ती मंदिलाच्या पुढील भागी लावलेली असावी.
38
ती अहरोनाच्या कपाळावर असावी, ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक पवित्र करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी ते अर्पण करतील, त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; ती नित्य त्याच्या कपाळावर असावी; अशाने ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील.
39
चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा, तसेच एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.
40
अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे करावेत; त्यांच्या-साठी कमरबंद व फेटे करावेत, ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावीत.
41
तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा. त्यांच्यावर संस्कार करावा, आणि त्यांना पवित्र करावे म्हणजे ते याजक ह्या नात्याने माझी सेवा करतील.
42
त्यांच्यासाठी सणाचे चोळणे करावेत, म्हणजे त्यांचे अंग झाकलेले राहील; ते कंबरेपासून मांडीपर्यंत असावेत,
43
आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शनमंडपात2 प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावेत. नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील; अहरोनाला व त्याच्या पश्चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे.
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 29 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40