bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Exodus 40
Exodus 40
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 39
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
1
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2
“पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
3
त्यामध्ये साक्षपटाचा कोश ठेव आणि तो अंतरपटाने झाक.
4
मेज आत नेऊन त्यावरील सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
5
साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.
6
दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.
7
दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान गंगाळ ठेवून त्यात पाणी भर.
8
सभोवती अंगण कर व त्याच्या फाटकास पडदा लाव.
9
अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला आणि त्यातल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल.
10
होमवेदी व तिचे सर्व सामान ह्यांना अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे वेदी परमपवित्र होईल.
11
गंगाळ व त्याची बैठक ह्यांना अभिषेक करून गंगाळ पवित्र कर.
12
अहरोन आणि त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दाराजवळ नेऊन आंघोळ घाल.
13
अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे तो याजक ह्या नात्याने माझी सेवा करील.
14
त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल;
15
त्यांच्या बापाला जसा अभिषेक करशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक ह्या नात्याने ते माझी सेवा करतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
16
मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले.
17
दुसर्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवासमंडपाची उभारणी झाली.
18
मोशेने निवासमंडप उभा केला; त्याने त्याच्या उथळ्या बसवून फळ्या लावल्या, अडसर लावले व त्याचे खांब उभे केले;
19
त्याने निवासमंडपावरून तंबू ताणला व तंबूचे आच्छादन त्यावर घातले; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
20
त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले;
21
त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
22
त्याने निवासमंडपाच्या उत्तर बाजूस दर्शनमंडपात अंतरपटाच्या बाहेर मेज ठेवले;
23
आणि त्याच्यावर त्याने परमेश्वरासमोर भाकर व्यवस्थित-पणे मांडली; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
24
त्याने निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.
25
आणि परमेश्वरासमोर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
26
त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली;
27
तिच्यावर त्याने सुगंधी द्रव्याचा धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
28
त्याने निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.
29
आणि दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दाराजवळ होमवेदी ठेवून तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
30
दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान त्याने गंगाळ ठेवून धुण्यासाठी त्यात पाणी भरले.
31
मोशे आणि अहरोन व त्याचे मुलगे त्यात आपापले हातपाय धूत.
32
ते दर्शनमंडपात किंवा वेदीजवळ जात तेव्हा ते आपले हातपाय तेथे धूत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
33
त्याने निवासमंडपासभोवती आणि वेदीच्या आसपास अंगणाची कनात उभी केली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला.
34
मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
35
दर्शनमंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना.
36
इस्राएल लोकांच्या एकंदर प्रवासात निवासमंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत;
37
आणि तो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
38
परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे; हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्राएल घराण्याच्या दृष्टीस पडत असे.
← Chapter 39
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40