bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Exodus 38
Exodus 38
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 37
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 39 →
1
त्याने होमवेदी बाभळीच्या लाकडाची बनवली; तिची लांबी पाच हात व रुंदी पाच हात अशी ती चौरस असून तिची उंची तीन हात होती.
2
त्याने तिच्या चार्ही कोपर्यांत चार शिंगे बनवली; ती अंगचीच होती; त्याने ही वेदी पितळेने मढवली;
3
आणि त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली.
4
वेदीला त्याने सभोवती कंगोर्याच्या खाली पितळेच्या जाळीची एक चाळण बनवली; ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यंत होती.
5
त्याने पितळेच्या चाळणीच्या चार्ही कोपर्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या.
6
त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते पितळेने मढवले.
7
वेदी उचलण्यासाठी तिच्या बाजूंच्या कड्यांत दांडे घातले; वेदी मध्यभागी पोकळ ठेवून बाजूंना फळ्या बसवून ती बनवली.
8
त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनवली. दर्शनमंडपाच्या दाराजवळ सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते.
9
त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून एक कनात केली, तिची लांबी शंभर हात होती.
10
तिच्यासाठी वीस खांब होते व त्या खांबांसाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
11
त्यांच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठीही वीस खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
12
आणि पश्चिम बाजूला पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याही होत्या; ह्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
13
पूर्वेकडील बाजू पन्नास हात ठेवली होती.
14
अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी तीन खांब व उथळ्याही तीन होत्या.
15
आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही तशीच होती; अंगणाच्या फाटकाच्या ह्या बाजूला व त्या बाजूला पंधरा-पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांच्यासाठी तीन-तीन खांब व उथळ्याही तीन-तीन होत्या.
16
अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते.
17
खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; त्यांचे मथळे चांदीने मढवले होते; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.
18
अंगणाच्या फाटकाचा पडदा वेलबुट्टीदार असून, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्याची लांबी वीस हात व रुंदीकडील उंची अंगणाच्या पडद्याइतकी पाच हात होती.
19
त्याचे खांब चार आणि त्यांच्यासाठी पितळेच्या उथळ्या चार होत्या; त्यांच्या आकड्या चांदीच्या असून त्यांचे मथळे चांदीने मढवले होते व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
20
निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.
21
निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याने केली तीच ही.
22
ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहूदा वंशातील हूराचा नातू म्हणजे ऊरीचा मुलगा बसालेल ह्याने बनवल्या.
23
त्याच्या जोडीला दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब हा कोरीव काम करणारा कुशल कारागीर असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारा होता.
24
पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी लागलेले सोने, म्हणजे लोकांनी अर्पण केलेले सगळे सोने एकोणतीस किक्कार1 होते, आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते सातशे तीस शेकेल होते.
25
मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली होती, त्यांनी जी चांदी अर्पण केली ती शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ती सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.
26
म्हणजे जितके वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा, ते सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरले. त्यांतल्या प्रत्येकामागे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलना-प्रमाणे एकेक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.
27
ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या ओतायला लागली; एकेका उथळीला एकेक किक्कार अशा शंभर किक्कारांच्या शंभर उथळ्या केल्या.
28
आणि बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी खांबांसाठी आकड्या करायला, खांबांच्या मथळ्यांवर मढवणी करायला व त्याच्यासाठी बांधपट्ट्या बनवायला लागली.
29
अर्पण केलेले पितळ सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल होते.
30
ते पितळ घेऊन दर्शनमंडपाच्या दाराच्या उथळ्या, पितळी वेदी व तिची पितळी चाळण आणि वेदीचे सर्व सामान,
31
अंगणाच्या चार्ही बाजूंच्या उथळ्या व त्यांच्या फाटकाच्या उथळ्या, आणि निवासमंडप व अंगण ह्यांच्या चार्ही बाजूंच्या मेखा बनवल्या.
← Chapter 37
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 39 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40