bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Exodus 39
Exodus 39
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 38
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 40 →
1
परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली, आणि अहरोनासाठी पवित्र वस्त्रे केली.
2
त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.
3
त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले आणि ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली.
4
त्यांनी एफोदाला खांदपट्ट्या जोडल्या; त्याची दोन्ही टोके जोडली.
5
एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली; ती सोन्याच्या जरीची आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
6
मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी गोमेद रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नावे कोरली; ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवली.
7
इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावीत म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
8
त्याने एफोदाप्रमाणेच सोन्याच्या जरीचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट कुशल कारागिराकडून बनवला.
9
तो चौरस होता; त्यांनी तो दुहेरी केला; दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद होता.
10
त्यात रत्नांच्या चार रांगा बसवल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
11
दुसर्या रांगेत पाचू, नीलमणी व हिरा;
12
तिसर्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
13
आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत जडवली.
14
इस्राएलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने होती; त्यांच्या संख्येइतकी बारा नावे होती. मुद्रा जशी कोरतात तशी बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर त्यांनी कोरले.
15
दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या ऊरपटावर लावल्या.
16
सोन्याची दोन जाळीदार कोंदणे आणि सोन्याच्या दोन कड्या करून ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावल्या.
17
ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या दोन्ही कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या.
18
पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके दोन्ही जाळीदार कोंदणांत जडवून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या भागी लावली.
19
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर म्हणजे एफोदाच्या आतल्या बाजूस असलेल्या कोरीवर लावल्या.
20
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्या-जवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या.
21
त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने अशा बांधल्या की, कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर तो राहावा आणि एफोदावरून ऊरपट सरकू नये; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
22
त्याने एफोदाबरोबर घालायचा झगा विणून संपूर्ण निळ्या रंगाचा केला;
23
मध्यभागी चिलखताच्या गळ्याप्रमाणे एक गळा ठेवावा आणि तो फाटू नये म्हणून त्या गळ्याच्या किनारीला सभोवती गोट घातला.
24
त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कातलेल्या सुताची डाळिंबे काढली.
25
तसेच त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली आणि झग्याच्या खालच्या घेरात सभोवती दोन-दोन डाळिंबांच्या दरम्यान एकेक अशी ती लावली;
26
म्हणजे सेवा करण्यासाठी घालायच्या झग्याच्या खालच्या घेरात सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब, पुन्हा एक घुंगरू व एक डाळिंब अशी ती लावली; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
27
अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे,
28
आणि तलम सणाचा मंदिल, तलम सणाचे सुंदर फेटे, कातलेल्या तलम सणाचे चोळणे,
29
कातलेल्या तलम सणाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरबंद हे बनवले; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
30
त्यांनी पवित्र मुकुटाची पट्टी शुद्ध सोन्याची केली व मुद्रा कोरतात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरली: परमेश्वरासाठी पवित्र.
31
ती मंदिलावर बांधता यावी म्हणून तिला त्यांनी निळ्या रंगाची फीत लावली; परमेश्वराने मोशेला सांगितल्या-प्रमाणे हे केले.
32
ह्या प्रकारे दर्शमंडपाच्या निवासमंडपाचे सर्व काम समाप्त झाले; परमेश्वराने आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्राएल लोकांनी हे सर्व केले.
33
त्यांनी मग तो निवासमंडप मोशेकडे आणला; तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे त्याच्या आकड्या, त्याच्या फळ्या, त्याचे अडसर, त्याचे खांब व त्याच्या उथळ्या;
34
आणि लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी आणि अंतरपट;
35
साक्षपटाचा कोश व त्याचे दांडे आणि दयासन;
36
मेज, त्यावरील सर्व सामान व समक्षतेची भाकर;
37
शुद्ध दीपवृक्ष, त्याचे दिवे म्हणजे रांगेने लावायचे दिवे, त्याची सर्व उपकरणे आणि दिव्यांसाठी तेल;
38
सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;
39
पितळी वेदी आणि तिची पितळेची जाळी, तिचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक;
40
अंगणाचे पडदे (अंगणाच्या कनाती), खांब व उथळ्या, अंगणाच्या फाटकाचा पडदा, तणावे, मेखा आणि निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य;
41
पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे, ही सर्व त्यांनी आणली.
42
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तिला अनुसरून इस्राएल लोकांनी सगळे काम केले.
43
लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले. ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते, म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला.
← Chapter 38
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 40 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40