bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Exodus 6
Exodus 6
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 7 →
1
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्या लोकांना जाऊ देईल; मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.” मोशेला दुसर्यांदा झालेले पाचारण
2
देव मोशेशी बोलला; तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे.
3
मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना सर्वसमर्थ1 देव म्हणून प्रकट झालो तथापि परमेश्वर2 ह्या माझ्या नावाने मी त्यांना ज्ञात नव्हतो.
4
ज्या कनान देशात ते उपरे होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे;
5
शिवाय ह्या इस्राएल लोकांना मिसर्यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे.
6
म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;
7
मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल.
8
आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हांला नेईन आणि तो तुम्हांला वतन करून देईन; मी परमेश्वर आहे.”’
9
मोशेने हे सारे इस्राएल लोकांना सांगितले; पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेनात.
10
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
11
“तू जाऊन मिसराचा राजा फारो ह्याला सांग की, ‘इस्राएल लोकांना तुझ्या देशातून जाऊ द्यावे.”’
12
तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, इस्राएल लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? मी बेसुनत ओठांचा3 आहे.”
13
ह्या प्रकारे परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांच्याशी बोलला; मिसर देशातून इस्राएल लोकांना बाहेर नेण्यासाठी त्याने त्यांना इस्राएल लोकांसंबंधी आणि मिसराचा राजा फारो ह्यांच्यासंबंधी आज्ञा केली.
14
त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख पुरुष हे: इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन ह्याचे मुलगे हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी; ही रऊबेनाची कुळे.
15
शिमोनाचे मुलगे: यमुवेल, यामीन, ओहद, याखीन, जोहर व कनानी स्त्रीपासून झालेला शौल; ही शिमोनाची कुळे.
16
लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही: गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.
17
गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या-त्यांच्या कुळाप्रमाणे हे: लिब्नी व शिमी.
18
कहाथाचे मुलगे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल; कहाथाचे आयुष्य एकशे तेहेतीस वर्षांचे होते.
19
मरारीचे मुलगे: महली व मूशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही आहेत.
20
अम्रामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली; तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले; अम्रामाचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.
21
इसहाराचे मुलगे: कोरह, नेफेग व जिख्री.
22
उज्जीएलाचे मुलगे: मीशाएल, एलसाफान व सिथ्री.
23
अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली; तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.
24
कोरहाचे मुलगे: अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे.
25
अहरोनाचा मुलगा एलाजार ह्याने पुटीएलाच्या मुलींपैकी एक बायको केली; तिच्यापासून त्याला फिनहास झाला. त्यांच्या-त्यांच्या घराण्यांप्रमाणे लेव्यांच्या पूर्वजांचे प्रमुख पुरुष हेच.
26
इस्राएल लोकांच्या सेना करून त्यांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले तेच हे अहरोन व मोशे.
27
इस्राएल लोकांना मिसरातून बाहेर काढण्याविषयी मिसराचा राजा फारो ह्याच्याशी जे बोलले तेच हे मोशे व अहरोन.
28
मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला. त्या दिवशी
29
परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे; मी तुला सांगतो ते सर्व मिसराचा राजा फारो ह्याला सांग.”
30
तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, मी बेसुनत (जड) ओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकणार?”
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40