bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Exodus 30
Exodus 30
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 29
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 31 →
1
धूप जाळण्यासाठी एक वेदी कर; ती बाभळीच्या लाकडाची असावी.
2
तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस असावी; आणि तिची उंची दोन हात असून तिची शिंगे अंगचीच असावीत.
3
त्या वेदीचा वरचा भाग व तिच्या चार्ही बाजू आणि तिची शिंगे अशी ती सगळी शुद्ध सोन्याने मढवावी व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
4
वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी सोन्याच्या कड्या करून त्या कंगोर्याखाली तिच्या दोन्ही अंगांना दोन कोनांस दोन-दोन अशा लावाव्यात.
5
दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत.
6
साक्षपटाच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटासमोर, अर्थात साक्षपटावरील ज्या दयासनी मी तुला भेट देत जाईन त्यासमोर ही वेदी ठेवावी.
7
ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा; रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा.
8
तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा; हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा.
9
तिच्यावर निराळा धूप, होमार्पणे, अन्नार्पणे, अथवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पायचे नाही.
10
अहरोनाने वर्षातून एकदा तिच्या शिंगासाठी1 प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्ता-साठी अर्पण केलेल्या पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे; ही वेदी परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र होय. जिवाच्या खंडणीसाठी द्यायचा पैसा
11
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
12
“तू इस्राएल लोकांची खानेसुमारी करशील तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येकाने त्या वेळी आपल्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा.
13
जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा (शेकेल म्हणजे वीस गेरे); हा अर्धा शेकेल परमेश्वराप्रीत्यर्थ केलेले समर्पण होय.
14
वीस वर्षांच्या व त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये ज्यांची गणना होईल त्यांतील प्रत्येकाने परमेश्वराप्रीत्यर्थ हे समर्पण करावे.
15
तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वरा-प्रीत्यर्थ हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलाहून अधिक देऊ नये आणि गरिबाने त्याहून कमी देऊ नये.
16
इस्राएल लोकांपासून प्रायश्चित्ताचा पैसा घेऊन दर्शनमंडपातील सेवेला लावावा आणि हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”
17
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
18
“धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे; त्याला पितळेची बैठक करावी; ते दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे.
19
त्यात अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हातपाय धुवावेत;
20
ते दर्शनमंडपात जातात आणि वेदीजवळ सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातात त्या वेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावेत, नाहीतर ते मरतील.
21
अहरोन व त्याचे वंशज ह्यांच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”
22
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
23
“तू उत्तम प्रकारचे मसाले घे, म्हणजे पवित्रस्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस, त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, अडीचशे शेकेल सुगंधी बच,
24
पाचशे शेकेल तज, आणि एक हिनभर जैतुनाचे तेल हे सर्व घेऊन,
25
त्यांचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर; हे अभिषेकाचे पवित्र तेल होय.
26
ह्या तेलाने दर्शनमंडप व साक्षीचा कोश,
27
मेज व त्यावरील सर्व सामान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी,
28
होमवेदी, तिचे सर्व सामान व बैठकीसह गंगाळ ह्यांना अभिषेक करावा.
29
त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील; त्यांचा स्पर्श ज्यांना होईल ते पवित्र होतील.
30
आणि याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना अभिषेक करून पवित्र कर.
31
इस्राएल लोकांना सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हांला माझ्याप्रीत्यर्थ हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार.
32
हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावायचे नाही व ह्या प्रकारचे मिश्रण कोणी करायचे नाही; हे पवित्र आहे; आणि तुम्ही ह्याला पवित्रच लेखावे.
33
जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
34
आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद, ही सर्व समभाग घ्यावीस.
35
आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावेस;
36
त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शनमंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.
37
जे धूपद्रव्य तू तयार करशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये; हे परमेश्वराप्रीत्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे.
38
कोणी वास घेण्याकरता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
← Chapter 29
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 31 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40