bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Exodus 34
Exodus 34
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 33
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 35 →
1
परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून तयार कर म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन.
2
तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर हजर हो.
3
तुझ्याबरोबर कोणीही वर चढून येऊ नये, सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये, तसेच शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये.”
4
तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सीनाय पर्वतावर चढून गेला.
5
तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्याजवळ उभा राहिला, आणि त्याने ‘परमेश्वर’ ह्या नावाची घोषणा केली.
6
परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
7
हजारो जणांवर1 दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”
8
तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले;
9
आणि तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे; हे लोक ताठ मानेचे आहेत; तरी आमचा अन्याय व पाप ह्यांची क्षमा कर व आम्हांला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर.”
10
परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी एक करार करतो; तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
11
मी तुला आज्ञा देऊन सांगतो, ते तू पाळ; मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांना घालवून देतो.
12
तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.
13
त्यांच्या वेद्या पाडून टाका; त्यांचे स्तंभ फोडून टाका, आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा2 भंग करा;
14
कारण तुला दुसर्या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे;
15
तू सावध राहा. देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करायचा नाही; नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील, आणि त्यांच्यातल्या कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील;
16
त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरता बायका करून घेशील, आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील.
17
तू आपल्यासाठी ओतीव देव करू नकोस.
18
बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नेमलेल्या समयी सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास.
19
प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तुझ्या गुराढोरांपैकी गाईंचे व मेंढरांचे प्रत्येक प्रथमनरवत्स माझे आहेत.
20
गाढवीचे पहिले शिंगरू खंडणीदाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे; त्याला तसे सोडवले नाही, तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
21
सहा दिवस तू आपले कामकाज कर, पण सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे.
22
तू सप्ताहाचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथमपिकाचा सण पाळावास.
23
वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्याच्यासमोर हजर व्हावे.
24
मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन व तुझी सरहद्द वाढवीन; वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर हजर होण्यास जाशील तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही.
25
माझ्या यज्ञपशूचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये. वल्हांडण सणातल्या यज्ञपशूचे काहीएक सकाळपर्यंत राहू देऊ नये.
26
आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”
27
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.”
28
मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा वचने लिहून ठेवली.
29
मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते.
30
मोशेच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले.
31
मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्यांना बोलावले; तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला.
32
नंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही सीनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले.
33
मोशेने त्यांच्याशी बोलणे संपवल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले;
34
पण मोशे परमेश्वराशी संभाषण करायला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढत असे; मग जी काही आज्ञा त्याला होई ती तो बाहेर येऊन इस्राएल लोकांना सांगत असे.
35
इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहत तेव्हा त्याच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करण्यास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे.
← Chapter 33
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 35 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40