bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 1
Proverbs 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 2 →
1
इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याची नीतिसूत्रे:
2
ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे;
3
सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत.
4
भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे;
5
ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा;
6
बोधवचने व दृष्टान्त, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावीत; ह्यासाठी ही आहेत.
7
परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात.
8
माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;
9
कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत.
10
माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस.
11
ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू;
12
त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू.
13
आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू;
14
तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू;”
15
तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस.
16
कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.
17
एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत, जाळे पसरणे व्यर्थ होय.
18
ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात.
19
धनाचा लोभ धरणार्या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.
20
ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते;
21
गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात, घोषणा करते, नगरात आपले हे शब्द उच्चारते:
22
“अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?
23
माझा वाग्दंड ऐकून वळा; पाहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन, मी आपली वचने तुम्हांला कळवीन.
24
मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;
25
तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अव्हेर केला, व माझा वाग्दंड मुळी जुमानला नाही;
26
ह्यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन; तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन;
27
वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल, आणि तुफानाप्रमाणे तुम्हांला विपत्ती प्राप्त होईल; विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील.
28
तेव्हा ते मला हाक मारतील; पण मी उत्तर देणार नाही; ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यांना सापडणार नाही;
29
कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही;
30
त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखला;
31
म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील;
32
कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल; मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते;
33
पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.”
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31