bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 14
Proverbs 14
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 15 →
1
प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.
2
जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटिल असतात तो त्याला तुच्छ मानतो.
3
मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते.
4
बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते.
5
विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही; खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो.
6
निंदक ज्ञानाचा शोध करतो, पण व्यर्थ; समंजसाला ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते.
7
मूर्ख मनुष्याच्या वार्यास जाऊ नकोस, कारण त्याच्या ठायी तुला ज्ञानाची वाणी आढळणार नाही.
8
शहाण्याने आपला मार्ग जाणणे ह्यात त्याची सुज्ञता असते. पण मूढांची मूढता कपटरूप होय.
9
मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु सरळ जनांत परस्पर प्रेमभाव असतो.
10
हृदयाला आपल्या ठायीच्या खेदाची जाणीव असते, आणि परक्याला त्याच्या आनंदाच्या आड येववत नाही.
11
दुर्जनांचे घर कोसळते, सरळांचा तंबू चांगला राहतो.
12
मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.
13
हसतानादेखील हृदय खिन्न असते, आणि हर्षाचा शेवट दु:खात होतो.
14
भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो, आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो.
15
भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.
16
सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो;
17
शीघ्रकोपी मूर्खपणा करतो; दुष्ट संकल्प योजणार्याचा लोक द्वेष करतात.
18
भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करतात.
19
दुर्जन सज्जनांपुढे नमतात, दुष्ट लोक नीतिमानाच्या दारापुढे नमतात.
20
गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात.
21
जो आपल्या शेजार्याचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरिबांवर दया करतो तो धन्य होय.
22
दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय? चांगल्याची मसलत करणार्यांना दया व सत्य ही प्राप्त होतात.
23
सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते.
24
सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते.
25
खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवतो; पण जो आपल्या मुखावाटे लबाडी उच्चारतो तो दगलबाजी करतो.
26
परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते.
27
परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते.
28
प्रजावृद्धीत राजाचे वैभव असते; प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो.
29
ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो.
30
शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
31
जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
32
विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते.
33
बुद्धिमानाच्या अंत:करणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामीची गोष्ट तेव्हाच कळते.
34
नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते; पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते.
35
शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो, पण निर्लज्जपणे वागणार्यांवर तो रुष्ट होतो.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31