bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 17
Proverbs 17
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 18 →
1
एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा.
2
शहाणा सेवक लज्जा आणणार्या मुलावर हुकमत चालवील, व भाऊबंदांच्या वतनाचा विभागी होईल.
3
रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो.
4
दुष्कर्मी मनुष्य दुष्ट वाणी लक्ष देऊन ऐकतो; लबाड मनुष्य उपद्रवी जिव्हेला कान देतो.
5
जो गरिबाची कुचेष्टा करतो तो त्याला उत्पन्न करणार्याचा अवमान करतो; जो दुसर्याच्या विपत्तीमुळे आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही;
6
पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत;
7
उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही; मग खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल?
8
घेणार्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मोलवान आहे; ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते ते तो चातुर्याने करतो.
9
जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात.
10
वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.
11
फितुरी मनुष्य केवळ बंड करू पाहतो, म्हणून त्याच्याकडे निर्दय जासूद पाठवण्यात येईल.
12
जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो.
13
जो बर्याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही.
14
कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.
15
दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा, ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो.
16
मूर्खाला बुद्धी नसता ज्ञानाची खरेदी करण्यासाठी तो हाती द्रव्य का घेतो?
17
मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.
18
बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजार्यासमक्ष, हातावर हात मारून जामीन होतो.
19
जो कलहप्रिय तो अपराधप्रिय असतो; जो आपले दार उंच करतो तो नाशाला आमंत्रण देतो.
20
ज्याचे चित्त उन्मत्त असते त्याचे कल्याण होत नाही; ज्याची जिव्हा कुटिल असते तो विपत्तीत पडतो.
21
मूर्खाला जन्म देतो तो दु:खाची जोड करतो; मूर्खाच्या बापाला आनंद नाही.
22
आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय; खिन्न हृदय हाडे शुष्क करते.
23
न्यायमार्ग विपरीत करण्यासाठी, दुर्जन गुप्तपणे लाच घेतो.
24
जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटांकडे असतात.
25
मूर्ख मुलगा आपल्या बापाला दु:ख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो.
26
नीतिमानास दंड करणे व सरदारांना त्यांच्या सरळतेस्तव ताडन करणे योग्य नाही.
27
जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.
28
मौन धारण करणार्या मूर्खालाही शहाणा समजतात; तो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात.
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 18 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31